नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे चर्चा करणार आहेत (PM Modi sixth Video Conferencing with Chief Ministers). विशेष म्हणजे यावेळी सलग दोन दिवस पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. येत्या 16 आणि 17 जून रोजी ही बैठक होईल. दोन्ही दिवशी ही बैठक दुपारी 3 वाजता सुरु होईल (PM Modi sixth Video Conferencing with Chief Ministers).
काही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी 16 जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. याशिवाय ज्या राज्यांमध्ये कोरोना रिकव्हरी रेट जास्त आहे, अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत देखील याच दिवशी पंतप्रधानांची चर्चा होईल. यामध्ये पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड आणि झारखंड सारख्या राज्यांचा समावेश आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 जून रोजी पंतप्रधान मोदी ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानसह इतर राज्यांचा समावेश आहे.
मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठका
पहिली बैठक – 20 मार्च
दुसरी बैठक – 2 एप्रिल
दुसरी बैठक – 11 एप्रिल
तिसरी बैठक – 27 एप्रिल
पाचवी बैठक – 11 मे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याअगोदर पाच वेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. प्रत्येक बैठकीनंतर मोदींनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे 16 आणि 17 जून रोजी होणाऱ्या बैठकींकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
हेही वाचा :