नवी दिल्ली : लॉकडाऊन गेला आहे, मात्र कोरोना नाही, त्यामुळे विनामास्क फिरुन स्वतःला (PM Narendra Modi Address Nation) आणि आपल्या कुटुंबाला संकटात टाकू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं. लस मिळाल्यानंतर प्रत्येक भारतीयापर्यंत ती वेगाने पोहचवण्याची तयारी सुरु आहे. मात्र ‘दवाई’ मिळेपर्यंत ढिलाई करु नका, अशी तंबीच जणू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिली. मंगळवारी संध्याकाळी त्यांनी जनतेला संबोधित केले (PM Narendra Modi Address Nation).
यावेळी त्यांनी देशातील जनतेला सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊन गेला, पण अजून कोरोना गेलेला नाही, असं मोदी म्हणाले. तसेच, बेपर्वा वर्तनामुळे स्वतःच्याच कुटुंबाला संकटाला टाकताय, असंही मोदी यावेळी म्हणाले.
“कोरोनाची लस जेव्हा येईल, तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची जलदगतीने तयारी आहे”, असं कोरोनावरील लसीबाबत माहिती देताना मोदी म्हणाले.
LIVE
[svt-event title=”कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत लढाई कमकुवत होऊ देऊ नका – पंतप्रधान” date=”20/10/2020,6:15PM” class=”svt-cd-green” ] कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत लढाई कमकुवत होऊ देऊ नका, कोरोनाची लस जेव्हा येईल, ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची जलदगतीने तयारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी [/svt-event]
[svt-event title=”युरोपीय देशांमध्ये कोरोनाची आकडेवारी चिंताजनक पद्धतीने वाढली – पंतप्रधान” date=”20/10/2020,6:11PM” class=”svt-cd-green” ] अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी होता-होता चिंताजनक पद्धतीने वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी [/svt-event]
[svt-event title=”बेपर्वा वर्तनामुळे स्वतःच्याच कुटुंबाला संकटाला टाकताय – पंतप्रधान” date=”20/10/2020,6:10PM” class=”svt-cd-green” ] कोरोना गेला अशी समजूत करण्याची किंवा कोरोनापासून धोका नाही, असं मानण्याची ही वेळ नाही, अनेकांनी सावधानता बाळगणं बंद केल्याचे व्हिडीओ पाहिले, बेपर्वा वर्तनामुळे स्वतःच्याच कुटुंबाला संकटाला टाकताय : पंतप्रधान नरेंद्र मोदी [/svt-event]
[svt-event title=”भारतानं जास्तीत जास्त लोकांचं जीवन वाचवलं – पंतप्रधान” date=”20/10/2020,6:05PM” class=”svt-cd-green” ] भारतानं जास्तीत जास्त लोकांचं जीवन वाचवलं, 90 लाखापेक्षा जास्त बेड आपल्याकडे उपलब्ध, 12 हजार क्वारंटाईन सेंटर, 2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी [/svt-event]
[svt-event title=”लॉकडाऊन गेला, पण कोरोना नाही – पंतप्रधान” date=”20/10/2020,6:01PM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊन गेला, पण कोरोना नाही, भारतात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे मृत्यूदर 83 आहे, अमेरिका, ब्राझिल, ब्रिटनसारख्या देशात 600 पार [/svt-event]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन LIVEhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/flKyR5AJQx
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
- आज शाम 6 बजे राष्ट्र के नाम संदेश दूंगा। आप जरूर जुड़ें।Will be sharing a message with my fellow citizens at 6 PM this evening.
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2020
- We have made many interventions which are contributing to a better healthcare system.Take sanitation.Improved cleanliness.More toilet coverage.Who does this help the most?It helps the poor and under-privileged.It leads to a reduction in diseases: PM
— PMO India (@PMOIndia) October 19, 2020
- This happened because:India was one of the first countries to adopt a lockdown.India was one of the first to encourage the usage of masks.India actively began to work on effective contact-tracing.India was one of the earliest to deploy the rapid antigen tests: PM
— PMO India (@PMOIndia) October 19, 2020
- Today, we are seeing a decline in the number of cases per day and the growth rate of cases.India has one of the highest recovery rates of 88 percent: PM
— PMO India (@PMOIndia) October 19, 2020
“गेल्या सात-आठ महिन्यात भारताने कोरोनावर चांगलं यश मिळवलं आहे. ही परिस्थिती आपल्याला कायम ठेवायची आहे. देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. कोरोनाचं संकट कायम आहे. विनामास्क फिरु नका. स्वत:ला आणि कुटुंबीयांना संकटात टाकू नका. अजूनही सतर्कता बाळगा”, असं आवाहन करतानाच जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही, अशी सूचनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केली.
“सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. पण घराबाहेर पडताना काळजी घ्या. आपण लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ देशातून कोरोनाचं संकट गेलं असं होत नाही. कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे थोडीही चूक करू नका. आपल्यासह आपल्या कुटुंबाला संकटात टाकू नका”, असं आवाहन मोदींनी केलं. “जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही. तोपर्यंत कोणतीही हयगय करू नका. कोरोनाच्या लशीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून लवकरच ही लस सर्वांना मिळेल”, असा विश्वासही त्यांनी दिला.
“देशात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. आज देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. मृत्यूचे प्रमाण कमी आहे. जगातील संपन्न देशांपेक्षा जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात भारत यशस्वी होत आहे. कोविड महामारीविरूद्धच्या लढाईत वाढत्या चाचण्या ही एक आपली मोठी शक्ती आहे. सेवा परमो धर्म: च्या मंत्रानं डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी नि: स्वार्थपणे एवढी मोठी लोकसंख्येला सेवा देत आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये निष्काळजीपणाची ही वेळ नाही. कोरोना निघून गेला आहे किंवा कोरोनामुळे आता कोणताही धोका नाही”, असे समजण्याची ही वेळ नाही, असंही ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात सातव्यांदा पंतप्रधान मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. याआधी जनता कर्फ्यू, लॉकडाऊनची घोषणा, लॉकडाऊनमधील वाढ अशा मुद्द्यांवर भाष्य केले आहे. लाल किल्ल्यावर 74 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. देशात कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात असून वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दाखवताच वेगाने प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याची रूपरेखा तयार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली होती.
नोटाबंदीच्या विषयापासून जनता कर्फ्यू, लॉकडाऊन अशा अनेक महत्त्वाच्या घोषणांसाठी पंतप्रधानांनी रात्री आठ वाजताचा मुहूर्त निवडला होता. यावेळी मात्र त्यांनी संध्याकाळी सहा वाजताची वेळ निश्चित केली आहे.
PM Narendra Modi Address Nation
संबंधित बातम्या :
पुन्हा लॉकडाऊन लावण्याची अफवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणत्या विषयावर बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली!