नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विटरवर कोरोनावर नाविण्यपूर्ण उपाय सूचवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडून COVID – 19 Solution Challenge अशी स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्यांना 1 लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे (PM Narendra Modi).
नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक लिंक शेअर केली आहे. ही लिंक थेट या स्पर्धेच्या पेजवर घेऊन जाते. हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं अधिकृत पेज आहे.
Harnessing innovation for a healthier planet.
A lot of people have been sharing technology-driven solutions for COVID-19.
I would urge them to share them on @mygovindia. These efforts can help many. #IndiaFightsCorona https://t.co/qw79Kjtkv2
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2020
कोरोना देशात प्रचंड वेगावे वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतपरी मेहनत घेताना दिसत आहे. सरकारकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं जात आहे. मात्र, तरीही दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अखेर मोदींनी उपाययोजना सुचवण्याचं आवाहन केलं आहे.
COVID – 19 Solution Challenge पेजवर काय म्हटलं आहे?
“कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्व आवश्यक ते पाऊले उचलत आहे. भारतीय जनतेच्या पाठिंब्यामुळे आम्ही कोरोनाचा सामान करण्यास सक्षम आहोत. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचं पालन नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोरोनाला थांबवण्यासाठी काही तांत्रिक मदत देणाऱ्याचंही स्वागत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी काही तांत्रिक अॅप बनवणाऱ्याचंही स्वागत आहे. कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी व्हा”, असं COVID – 19 Solution Challenge पेजवर म्हटलं आहे.
हेही वाचा : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड, राष्ट्रपतींकडून शिफारस