नवी दिल्ली : जगभरात आज जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे (President Ramnath Kovind). या दिनाचे औचित्यसाधत राष्ट्रपतींनी महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा संकल्प करण्याचे आवाहन केलं आहे (President Ramnath Kovind).
Let us reaffirm our pledge to ensure safety and respect for women, so that they can move forward unhindered according to their wish in the direction of fulfilling their hopes and aspirations. #WomensDay
— President of India (@rashtrapatibhvn) March 8, 2020
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा! हा दिवस म्हणजे महिलांप्रती सन्मान प्रदर्शित करण्याचा दिवस आहे. समाज, देश आणि जगाच्या निर्मितीत महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या महिला दिनानिमित्ताने सर्व महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा संकल्प करुया, जेणेकरुन त्यांना आपल्या इच्छेनुसार स्वप्न पूर्ण करता येतील”, असं रामनाथ कोविंद म्हणाले.
On International Women’s Day greetings and best wishes to women in India and across our planet. This day is an occasion to celebrate the untiring efforts and crucial role of women in building a better society, nation and world.
— President of India (@rashtrapatibhvn) March 8, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील ट्विटरवर जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “मी नारीशक्तीला नमन करतो. समाजाला आकार देण्यासाठी नारीची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे”, असं अमित शाह म्हणाले.
Greetings on International Women’s Day.
I bow to the Naari-Shakti who have time and again played a defining role in shaping and nurturing our society. Women have always been the torch bearers of our lives, their selflessness and sacrifices in any role cannot be put in words. pic.twitter.com/1ahzlcktu4
— Amit Shah (@AmitShah) March 8, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरवर जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Greetings on International Women’s Day! We salute the spirit and accomplishments of our Nari Shakti.
As I’d said a few days ago, I’m signing off. Through the day, seven women achievers will share their life journeys and perhaps interact with you through my social media accounts.— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2020
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील जागतिक महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटमार्फत या शुभेच्छा दिल्या आहेत. “…करा विहार सामर्थ्याने! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जागतिक महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
#महिलादिवस #InternationalWomensDay#HappyWomensDay pic.twitter.com/SwMs1LOqkU
— Raj Thackeray (@RajThackeray) March 8, 2020
महाराष्ट्राच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महिला दिनानिमित्त उत्तम समाज घडवण्याचा निश्चय करुया म्हणजे ना हुंडा बळी, ना अॅसिड अटॅक, ना अत्याचार, ना निर्भया, ना हिंगणघाट फक्त उज्वल भविष्य… महिला दिनाच्या शुभेच्छा!”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
महिला दिनाच्या निमीत्त सर्व झालेल्या आणि होणाऱ्या माता ,आज सुपुत्री सोबत सुपुत्र आणि उत्तम समाज घडवण्यासाठी निश्चय करूया म्हणजे ना हुंडा बळी न ऍसिड अटॅक ना अत्याचार ना निर्भया ना हिंगणघाट फक्त उज्वल भविष्य स्वप्नांची पहाट..Happy women’s day??? https://t.co/8SwtCZY53H
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 7, 2020
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीदेखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महिला सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. त्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत, तिथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप सोडली आहे, त्यांचा वर्तमान अन भविष्य उज्वल आहे. जागतिक महिला दिनाच्या अनंत शुभेच्छा”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
महिला सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत.त्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत, तिथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप सोडली आहे,त्यांचा वर्तमान अन भविष्य उज्वल आहे.#जागतिकमहिलादिन अनंत शुभेच्छा. pic.twitter.com/CstinaAwTx
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 8, 2020