दिल्ली : देशामध्ये नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरूच आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रानेही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला होता. आता यावरूनच सोशल मीडियावर प्रियंकाला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. (Priyanka Chopra trolls after tweeting on farmers movement)
प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये राहत आहे आणि तिथे बसून भारतातील आंदोलनावर तिने बोलू नये आणि तिला तेथील शेतकऱ्यांचे दुःख काय माहिती आहे, असे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. प्रियंका चोप्राने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, आमचे शेतकरी हे भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. यामधून काहीतरी मार्ग काढावा. या तिने केलेल्या ट्विटवरूनच तिला ट्रोल केले जात आहे.
प्रियंका चोपड़ा is trying to support Farmers from USA #PriyankaChopra
MEANWHILE EVERY NATIONALIST ?? pic.twitter.com/eTuMGRNJxm
— ?…..विनिशा…..? (@SinhaaVinisha) December 8, 2020
अनुपम खेर यांनी नवीन कृषी कायद्यांविरोधात एक मोठ धक्कादायक विधान केले होते. त्यांचे म्हणणे आहे की, सरकारने शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या ऐकल्या पाहिजेत. मात्र, कधी कधी हे शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते. आंदोलनामध्ये सरकारच्या निषेधार्थ दाखवण्यात आलेले खलिस्तानी झेंडे ही एक चिंतेची गोष्ट आहे.
हे आंदोलन काही लोक हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन हायजॅक होत असल्याचे पाहुण दुःख होत आहे. आपल्या देशात शेतकऱ्याला देव मानले जाते. ते आपले अन्नदाता आहेत त्यांनी आपल्या देशासाठी जे काही केले त्याबद्दल मी त्याच्या आभारी आहे. अनुपम खेर पुढे म्हणाले की, काही लोक ज्यांना या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काहीच देणे घेणे नाही तेही यामध्ये हात धुऊन घेत आहेत. शेतकरी त्यांचा अजेंडा ठेवूनच काम करत आहेत. मात्र काही लोकांमुळे आंदोलनाची दिशा बदलण्याची भिती वाटत आहे. जो कोणी अन्न खातो तो शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकऱ्याना साथ देईल.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी बिलाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. 26 नोव्हेंबरपासून शेतकरी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आतापर्यंत शेतकरी आणि सरकार यांच्यात बर्याच चर्चा झाल्या आहेत. मात्र यामधून मार्ग काहीच निघाला नाही. बुधवारी सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहे.
संबंधित बातम्या :
Kangana Ranaut | शेतकरी आंदोलनावर कंगनाची टीवटीव सुरूच, आता म्हणाली…
(Priyanka Chopra trolls after tweeting on farmers movement)