पुणे : पुण्यात मध्यवर्ती पेठा आणि उपनगरांमध्ये (Budhwar Peth Sex Workers) कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत रेड लाइट एरिया अशी ओळख असलेल्या बुधवार पेठ हा परिसर कोरोनापासून दूर आहे. सेक्स वर्कर महिलांना लॉकडाऊनचा (Lockdown) मोठा फटका बसला आहे. त्यांच्या उपजीविकेचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिन्याला 3 ते 4 हजार रुपये मासिक भत्ता देण्याची मागणी या सेक्स वर्कर्सने केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र (Budhwar Peth Sex Workers) पाठवलं आहे.
संपूर्ण पुण्यात कोरोनाने विळखा घातला आहे. मध्यवर्ती पेठा आणि उपनगरांमध्ये कोरोनाचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. अशाही परिस्थितीत बुधवार पेठेत मात्र अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र, इथल्या सेक्स वर्कर महिलांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.
लॉकडाऊनमुळे या सेक्स वर्कर्सच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आम्हाला महिन्याला 3 ते 5 हजार मासिक भत्ता देण्याची मागणी या महिलांनी केली आहे. यासंदर्भात काही एनजीओच्या माध्यमातून पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे (Budhwar Peth Sex Workers).
बुधवार पेठेत कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. मात्र, हा भाग कंटेनमेंट झोनमध्ये येत असल्याने त्यांच्यावर निर्बंध आहेत.
काही सेवाभावी संस्थांच्या वतीने सेक्स वर्कर महिलांना अन्नधान्य दिले जात आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कसलीही मदत झाली नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. लॉकडाऊननंतर अनेक सेक्स वर्कर महिला त्यांच्या गावी गेल्या आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्र आणि अपूर्ण कागदपत्रांअभावी अनेक महिला इथेच अडकून पडल्या आहेत. अद्याप अडीच हजार महिला इथे अडकून पडल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने महिन्याला 3 ते 4 हजार रुपये द्यावे, अशी मागणी या महिलांनी केली आहे (Budhwar Peth Sex Workers).
पुण्यात कोरोनाबाधितांवर रुग्णालयाऐवजी घरीच उपचार, अटी काय?https://t.co/fxZHMQXXZR #Pune #PuneFightsCorona
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2020
संबंधित बातम्या :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील पेट्रोल पंपवर आत्मनिर्भर उपक्रम
पुणे विभागातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 62.95 टक्के, 8 हजार 862 जण कोरोनामुक्त
Pune Death Rate | पुण्याचा मृत्यूदर घसरला, मात्र तरीही राज्य आणि देशापेक्षा जास्तच
पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त