पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे प्रमाण अचानकपणे वाढले आहे. कदमवाक वस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या गावात घरफोडी होत असल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत. कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन या तीन ग्रामपंचायत हद्दीत गेल्या सहा दिवसाच्या कालावधीत चोरट्यांनी दहाहून अधिक ठिकाणी चोरी केली आहे. (Pune Burglary cases increase in last six days)
या चोरट्यांनी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील चार दुकानाचे शटर तोडत चोरी केली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे चोरट्यांनी कवडी-माळवाडी परिसरातील एका किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. या दुकानातील सात हजार रुपये रोख रक्कम आणि तुपाचे काही डबे घेऊन चोरटे पसार झाले.
तर किराना दुकानात चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी माळवाडी येथील एका मेडिकल दुकान आणि किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.
तर कवडी-माळवाडी परिसरातील किराणा दुकानात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी फुरसुंगी फाट्यासमोरील मोरया या कपड्याच्या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हे शटर मजबूत असल्याने ते दुकान लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.
दरम्यान पोलिसांकडून याप्रकरणी चौकशी सुरु आहे. सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांकडून या चोरांना लवकरच बेड्या ठोकण्यात येतील असे सांगण्यात येत आहे.(Pune Burglary cases increase in last six days)
संबंधित बातम्या :
चोरलेल्या रिक्षातच गप्पांचा फड, डोंबिवलीत चोरट्यांना फिल्मी स्टाईल अटक
पुण्यात प्रसिद्ध वकिलाचं अपहरण, घाट परिसरात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला