पुणे : पुण्यात गेल्या 61 दिवसांपासून सुरक्षित असलेल्या जनता वसाहतीत (Pune Corona Update) कोरोनाने शिरकाव केला आहे. जनता वसाहतीमध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु होता. प्रशासनाने तिनही रुग्णांच्या क्लोज कॉन्टॅक्टमधील लोकांचीदेखील चाचणी केली. त्या सर्वांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे (Pune Corona Update).
महाराष्ट्रातच नव्हे तर देशात झोपडपट्ट्यांमध्ये पसरलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला घाम फुटत आहे. मालेगाव आणि नागपुरातील दाट वस्तीचे परिसर, मुंबईतील धारावी झोपडपट्टी आणि पुण्याच्या दाट वस्ती असलेल्या पेठांमध्येही कोरोनाचं थैमान सुरु आहे. मात्र, पुण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी ठरलेल्या जनता वसाहतीत गेल्या 61 दिवसांपासून कोरोना पायदेखील ठेवू शकला नव्हता. नागरिकांनी दाखवलेली शिस्त आणि संयममुळेच ते शक्य झालं.
पुण्याच्या पर्वती टेकडीच्या पायथ्याला जनता वसाहत वसली आहे. सुमारे 100 एकर पर्वती टेकडीच्या उताऱ्यावर ही जनता वसाहत वसलेली आहे. जनता वसाहतीची लोकसंख्या 70 हजार इतकी आहे. पुण्यातील पेठा आणि दाट वस्तींचे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. मात्र, जनता वसाहतीत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. जनता वसाहतीत प्रशासनाने केलेलं नियोजन आणि नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद या दोन गोष्टींमुळे जनता वसाहतीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.
कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी जनता वसाहतीच्या नागरिकांचं नियोजन
संबंधित बातम्या :