पुणे : पुणेकरांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत (Punekars paid taxes through online) लॉकडाऊन काळात मिळकत कर भरण्याचे कर्तव्य पार पाडले. विशेष म्हणजे पुण्यात कोरोनाचं संकंट गडद असताना पुणेकरांनी जबाबदारीची जाणीव ठेवून कर भरला.
लॉकडाऊनदरम्यान तब्बल 2 लाख 22 हजार पुणेकरांनी ऑनलाईन पद्धतीने 280 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला. त्यामुळे पुणे महापालिकेला कोरोनाच्या संकटात आर्थिक मदत झाली आहे (Punekars paid taxes through online).
पुणे महापालिकेचे 2020-21 हे आर्थिक वर्ष सुरु व्हायला आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागू व्हायला एकच गाठ पडली. या काळात मालमत्ता कर भरणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेने संकेतस्थळावर मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिली.
पुणेकरांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरावा, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं. पुणेकरांनी या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 280 कोटींचा कर जमा केला.
पुणे महापालिका हद्दीत 10 लाख 57 हजार 716 मिळकती आहेत. तर 2020-21 या आर्थिक वर्षात मालमत्ता करामधून पालिकेला 1 हजार 511.75 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या 9 लाख 13 हजार 855 इतकी असून त्यांच्याकडून 1 हजार 365 कोटी 24 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहेत. तसेच नवीन समाविष्ट 11 गावांमधील 1 लाख 43 हजार 861 मिळकतींमधून 146 कोटी 51 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार