पुणे : पुण्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत चालला (Pune Corona Virus Update) आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहे. नुकतंच केंद्रीय पथकाने पुण्यातील उपाययोजनांची पाहणी केली. त्यानंतर पुण्यातील कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी दोन दिवस अतिरिक्त निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधानुसार जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकान बंद ठेवण्यात येणार आहे. त्यादरम्यान फक्त दूध विक्री केंद्र सुरु राहणार आहेत, असे आदेश सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.
पुण्यात दोन दिवस म्हणजे 22 ते 23 एप्रिल रोजी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात (Pune Corona Virus Update) आले आहे. पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्बंध असणार आहेत. यावेळेत सकाळी 10 ते 12 या वेळेत दूध विक्री केंद्र सुरु राहणार आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.
या दोन दिवसात जीवनावश्यक वस्तू म्हणजेच किराणामाल, भाजीपाला, फळे, चिकन, मटन, अंडी ई-कॉमर्स यांची विक्री केंद्र दुकाने वितरण सेवा पूर्ण बंद राहील. तर दूध विक्री केंद्र सकाळी दोन तास म्हणजे 10 ते 12 पर्यंत सुरू राहतील. दुधाच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र घरपोच दूध वितरण आणि दुकानातून होणाऱ्या दूध विक्रीवर वेळेचे बंधन राहील.
दूध विक्री केंद्रावर गर्दी टाळावी उपायोजना राबवणं बंधनकारक आहे. अन्यथा केंद्र बंद केले जाईल. तर पोलीस, संरक्षण, आरोग्य दवाखाना, औषध, अत्यवस्थ रुग्णाची वाहतूक, कोरोना संदर्भात पालिका आणि शासकीय सेवा, त्याचबरोबर शहर पोलिसांनी दिलेले डिजीटल पास यांना निर्बंध नसतील, असेही यात नमूद करण्यात आलं (Pune Corona Virus Update) आहे.
‘या’ भागात अतिरिक्त निर्बंध
महाराष्ट्रात 5218 कोरोना रुग्ण
राज्यात आज (21 एप्रिल) 552 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 5 हजार 218 झाली आहे. तर आज राज्यात 19 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 251 झाली आहे. तर आतापर्यंत 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात 99 हजार 569 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 7 हजार 808 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Pune Corona Virus Update) आहेत.