पुणे : पुण्यात मागील सहा महिन्यांहून अधिक काळ लोकल ट्रेन बंद आहे (Pune Local Train). मात्र सोमवारपासून (12 Oct) लोणावळा लोकल धावणार आहे. पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी पहिली लोकल सुटणार आहे. लोकल सुरु झाल्याने प्रवाशांना मात्र थोडाफार दिलासा मिळणार आहे (Pune Local Train).
पुणे रेल्वे स्थानकातून आज सायंकाळीही दुसरी लोकल ट्रेन धावणार आहे. संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी दुसरी लोकल ट्रेन पुण्याहून सुटणार आहे. लोणावळा येथून सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एकच लोकल सोडण्यात येणार आहे.
लोकल ट्रेनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार नाही.
लोकलच्या वेळा
पुण्यातून – सकाळी 8.05
सायंकाळी 6.05
लोणावळ्याहून – सकाळी 8.20
सायंकाळी – 5.05
मुंबई लोकलही जून-जुलैच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी सुरु केली आहे. पण तरीही ट्रेनमध्ये मोठ्या प्रमणात गर्दी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ केली आहे.
15 ऑक्टोबरच्या आसपास मुंबई लोकल सुरु होण्याची शक्यता
15 ऑक्टोबरपर्यंत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याबाबत शक्यता वर्तवली होती. आम्हा सर्वांचाच असा विचार आहे की, लोकल ट्रेन आता सुरु कराव्यात, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
मुंबईसह देशभरात बसेस सुरु झाल्या आहेत. लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या व विमानेदेखील सुरु करण्यात आली आहेत. मात्र अद्याप मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता प्रत्येक मुंबईकराला मुंबई लोकल सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या :
लोकल सुरु करण्याची घाई संकटात नेईल, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच वक्तव्य
15 ऑक्टोबरच्या आसपास मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याच्या हालचाली : जयंत पाटील