पुणे : पुण्यात लॉकडाऊनचा पहिला पाच दिवसांचा टप्पा (Pune Lockdown Second Phase) 18 तारखेला म्हणजेच उद्या शनिवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी नागरिकांना सवलत देण्याचा प्रशासनाचा विचार आहे (Pune Lockdown Second Phase).
रविवारी (19 जुलै) नागरिकांना सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत जीवनावश्यक दुकानांसाठी वेळ वाढून देण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. रविवारी जीवनावश्यक दुकानं नऊ तास सुरु राहण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी दुकानांसमोर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. याबाबत मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात विचारविनिमय सुरु आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
पुण्यात दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन
पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जाहीर केलेला 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. पुणे शहरात मंगळवार 14 जुलै मध्यरात्री एक वाजता सुरु झालेला लॉकडाऊन 23 जुलैपर्यंत कायम असेल. पुणे शहरातील रस्ते, पेठांचे भाग पोलिसांनी बंद केले असून लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे (Pune Lockdown Second Phase).
पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत.
Pune Lockdown | पुणे-पिंपरीमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरु; रस्ते-पेठांचे भाग बंद, सात हजार पोलिस तैनात https://t.co/51rSTxSJr5 #Punelockdown #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2020
Pune Lockdown Second Phase
संबंधित बातम्या :
Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा
पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर होम क्वारंटाईन, ड्रायव्हरला कोरोना