पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्या नावाची ‘सुसाईड नोट’ सापडल्याने धाकधूक वाढली आहे. व्यवसायातील नुकसानामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या चिठ्ठीमध्ये आहे. पाषाणकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे गौतम पाषाणकर हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. (Pune Missing Businessman Gautam Pashankar Suicide Note found with Driver)
ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून 64 वर्षीय गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाषणकर हे बुधवारी दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला.
नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनीही पाषाणकर यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरु झाली. या प्रकरणी सध्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात सुसाईड नोट
गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर शंकर यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती.
गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पाषाणकर तणावाखाली होते. ही सुसाईड नोट सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पाषाणकर यांचे कुणाशी वैर होते का? ते कुठे गेले असतील? बेपत्ता होण्यामागचं कारण काय असावं, या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे. (Pune Missing Businessman Gautam Pashankar Suicide Note found with Driver)
पोलीस सध्या जागोजागी पाषाणकर यांचा शोध घेत असून त्यांचे नातेवाईक आणि कार चालकाची चौकशी करत आहेत. पाषाणकर कोणालाही दिल्यास त्यांच्या कुटुंबाला 9822474747 या मोबाईल क्रमांकावर किंवा शिवाजीनगर पोलिस ठाण्याला 020-25536263 या क्रमांकावर कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
VIDEO : Gautam Pashankar | पाषाणकर आटोमोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर बेपत्ता pic.twitter.com/2RZWjIg3vZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2020
संबंधित बातम्या :
पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, शोध सुरु
(Pune Missing Businessman Gautam Pashankar Suicide Note found with Driver)