मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) संपूर्ण कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड केले. एक उत्तम यष्टीरक्षक, कर्णधार आणि मॅच फिनिशर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धोनीची कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) कारकीर्द तितकी खास नव्हती. मात्र तरी देखील कसोटी क्रिकेटमधील एक रेकॉर्ड हा गेली 15 वर्ष धोनीच्याच नावावर होता. धोनीसह एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आणि शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांनीही हा रेकॉर्ड केला होता. पण दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक कॉन्टन डीकॉकने (Quinton de Kock) हा रेकॉर्ड तोडत नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. हा रेकॉर्ड वेस्ट इंडीजमध्ये जाऊन वेस्ट इंडीज संघाविरोधात एका डावात सर्वाधिक षटकार खेचण्याचा होता. डीकॉकने दक्षिण आफ्रीका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या ग्रोस इले टेस्टमध्ये हा रेकॉर्ड तोडला आहे. (Quinton de Kock Breaks MS Dhoni 15 year old Sixes Record Against West Indies vs South Africa Test)
डीकॉकने दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या डावात हा रेकॉर्ड केला. आधी वेस्ट इंडिजला 97 धावांवर ऑलआऊट केल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 322 धावा केल्या. सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डिकॉकने 141 धावांची नाबाद खेळी केली. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे सहावे शतक ठरले. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोर असून 170 चेंडूत त्याने 12 चौकार आणि 7 षटकरांसह ही खेळी केली.
डीकॉकने एका डावात ठोकलेल्या सात षटकारांमुळे त्याने धोनी, आफ्रिदी आणि डिव्हिलियर्स यांचा रेकॉर्ड तोडला. या तिघांनीही वेस्ट इंडिजमध्यचे वेस्ट इंडिज विरोधात एका डावात प्रत्येकी 6 षटकार लगावले होते. आफ्रिदीने 2005 मध्ये, धोनीने 2006 आणि डिव्हिलियर्सने 2010 मध्ये ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे या रेकॉर्ड करणाऱ्यांमध्ये आफ्रिदी सोडता तिन्ही खेळाडू यष्टीरक्षक फलंदाज आहेत.
हे ही वाचा :
Video : Live सामन्यात शाकिब अल हसनला राग अनावर, अंपायरवर भडकून थेट स्टंपलाच मारली लाथ
IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…
(Quinton de Kock Breaks MS Dhoni 15 year old Sixes Record Against West Indies vs South Africa Test)