मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दस्ताऐवज दाखवून आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्रागा करून घेऊ नये. थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका. सोमय्यांच्या आरोपांना उत्तरं द्या, असं आव्हान भाजपचे आमदार राम कदम यांनी राऊत यांना दिलं आहे. (ram kadam reaction on sanjay raut statements)
राम कदम यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना हे आव्हान दिलं आहे. संजय राऊत का त्रागा करून घेत आहेत माहीत नाही. सोमय्या यांनी कागदपत्रांच्या आधारे आरोप केला आहे. त्यावर राऊतांनी बोललं पाहिजे. सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. थातूरमातूर उत्तरं देऊ नये, असं सांगतानाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर कुणी हा प्रश्नही उपस्थित केला नसता. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जमिनीचे 21 व्यवहार केलेत की नाही ते राऊतांनी सांगावं, असं कदम म्हणाले.
राऊत यांच्याबद्दल मला व्यक्तीगत खूप आदर आहे. पण आता माध्यमांशी बोलताना त्यांनी सोमय्यांच्या एका तरी आरोपाचं उत्तर दिलं आहे का?, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात आर्थिक हितसंबंध होते. त्यांच्यात जमिनीचा व्यवहार झाला होता, असा गंभीर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलेच फटकारले आहे. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी फडफड करत आहेत. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. मात्र, किरीट सोमय्या यांनी कितीही फडफड केली तरी त्यामधून काही निष्पन्न होणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
ईडीचे मालक दिल्लीत बसलेले आहे, यांना आम्ही २५ वर्ष घरी बसवू, ते स्वत: भ्रष्टाचारी आहे, यात ईडीचा काय संबंध, ईडी काय तुमच्या बापाची नोकर आहे का? : संजय राऊत लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/EPf1dLabSM
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2020
संबंधित बातम्या:
(ram kadam reaction on sanjay raut statements)