मुंबई : कोरोना विषाणूपासून देशाला वाचवण्यासाठी (CoronaVirus) सरकारने देशभरात (Ramayan Serial TRP) 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाउनची (Lock down) घोषणा केली.त्यामुळे इतके दिवस घरात राहून वेळ घालवणे अशक्य होत चाललं आहे. त्यामुळे लॉकडाउनला यशस्वी बनवण्यासाठी सरकारने लोकांच्या आग्रहास्तव रामायण (Ramayan Serial TRP) ही मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. दिवसाला दोन वेळा दूरदर्शन या चॅनेलवर ही मालिका दाखवली जाते.
रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या या जुन्या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीचे सर्व (TRP) रेकॉर्ड तोडले आहेत. जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर रामायण ही मालिका दाखवली जात होती. तेव्हा देशात लॉकडाऊन सारखी स्थिती होऊन जायची. जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर लागायची तेव्हा देशात कर्फ्यू लागल्या सारखं वाटायचं. तेव्हा ही मालिका हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वच धर्मिय पाहायचे. त्यामुळे ही मालिका अनेक भाषांमध्ये प्रसारित केली जात होती.
India Watches @DDNational, #IndiaFightsCarona
According to BARC, the re-telecast of #RAMAYAN, garnered the highest ever rating for a Hindi GEC show since 2015 when BARC started measuring TV audience
Read here: https://t.co/OqnZogCOKv pic.twitter.com/QB7v6SB2HB
— PIB India ?? #StayHome #StaySafe (@PIB_India) April 2, 2020
या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या आग्रहास्तव ही रामायण मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही मालिका सुरु झाल्यापासून पुन्हा एकदा या मालिकेने दाखवून दिले आहे ही आजही ही मालिका टीआरपीच्या बाबतीत सर्वोकृष्ट आहे. आजही या मालिकेच्या तोडीस दपसरी कुठलीही मालिका नाही. इतकंच नाही तर 2015 पासून ते आतापर्यंतच्या मनोरंजक मालिकांमध्ये ही मालिका टॉपवर आहे (Ramayan Serial TRP). या मालिकेच्या टीआरपीच्या रेटिंगची माहिती DD National चे सीईओ शशी शेखर यांनी दिली.
त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली. “मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, दूरदर्शनवर प्रसारित होणारी रामायण मालिका, 2015 पासून आतापर्यंतच्या सर्वाधिक टीआरपी जनरेट करणारी हिंदी मालिका ठरली आहे.”
सोशल मीडियावर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा प्रसारित कराव्या अशी मागणी जेर धरु लागली होती. त्यानंतर या मालिका टीव्हीवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आल्या. या मालिका बघून लोकांनी त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर आता शक्तीमान ही मालिका देखील प्रसारित (Ramayan Serial TRP) करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
संबंधित बातम्या :
अलिबागमध्ये दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, सात जण अटकेत
‘लॉकडाऊन’मध्ये रामदास आठवलेंनी तयार केला ‘हा’ खास पदार्थ
गंगाखेडमध्ये कोरोनाचा रुग्ण, संपर्कात आल्याने परभणीतील 9 जणांसह एकूण 20 जण संशयित
आव्हाड-मलिक यांच्या मोदींवरील टीकेला राम कदम यांचं प्रत्युत्तर