नागपूर: रेशन दुकानात ग्राहकांना रेशन देण्यासाठी लावण्यात आलेल्या ई-पॉस मशीनमुळे कोरोनाचा संसर्ग वाढून सात दुकानदारांचा मृत्यू झाल्याने नागपुरातील रेशन दुकानदार भयभीत झाले आहेत. त्यामुळे या दुकानदारांनी थेट राष्ट्रपतींकडे धाव घेतली असून रेशनिंगची ही ऑनलाइन पद्धत बंद करण्याची मागणी केली आहे. (ration shop owner wrote to president)
नागपुरात करोना रुग्णांची संख्या 80 हजाराच्या घरात गेली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९२५ नव्या रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकीकडे सरकारने दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य केलंय, तर दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनवर अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळत नाही. या ॲानलाईन पद्धतीमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. नागपुरात आतापर्यंत सात रेशन दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनाच्या काळात रेशन वितरणात ई-पॉस मशीन बंद करावी, यासाठी नागपूरातील रेशन दुकानदारांनी थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहीलं आहे.
ई-पॉस मशीनमुळे ग्राहक आणि रेशन दुकानदारांचा संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी दुकानदारांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून ही ॲानलाईन पद्धत बंद करण्यात यावी, या मागणीसाठीच आम्ही राष्ट्रपतींना पत्रं लिहिलं आहे, असं रेशन दुकानदार संघाचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी सांगितलं. (ration shop owner wrote to president)
संबंधित बातम्या:
कोरोना नियंत्रणासाठी आयुर्वेदा किट, रोग प्रतिकारकशक्ती वाढत असल्याचा दावा
मुंबईत रस्त्यावर-सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचं प्रमाण घटलं
शरद पवारांना कोरोनाची लस टोचली?; डॉक्टरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
(ration shop owner wrote to president)