Ratnagiri Corona | मुंबईहून आलेल्या चौघांना ‘कोरोना’, रत्नागिरीत कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

| Updated on: May 17, 2020 | 3:47 PM

मुंबईतून आलेल्या आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 86 वर पोहोचला आहे.

Ratnagiri Corona | मुंबईहून आलेल्या चौघांना कोरोना, रत्नागिरीत कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत (Ratnagiri Corona Cases Update) गेल्या 24 तासात पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईतून आलेल्या आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 86 वर पोहोचला आहे. त्यापैकी 15 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात (Ratnagiri Corona Cases Update) आलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 68 इतकी आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मंडणगड तालुक्यात पाहायला मिळत आहेत. मंडणगडमध्ये 23 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

रत्नागिरी कोणत्या जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात किती कोरोना रुग्ण

मंडणगड तालुका – 23 रुग्ण

चिपळूण तालुका – 6 रुग्ण

दापोली तालुका – 14 रुग्ण

संगमेश्वर तालुका – 10 रुग्ण

खेड तालुका – 7 रुग्ण

रत्नागिरी तालुका – 20 रुग्ण

लांजा तालुका – 2 रुग्ण

गुहागर तालुका – 3 रुग्ण

राजापूर तालुका – 1 रुग्ण

Ratnagiri Corona Cases Update

कुठल्या तालुक्यात किती कोरोना बळी

खेड तालुक्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

दापोली तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

गुहागर तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

राज्यातील स्थिती काय?

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज 1 हजार 606 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात आतापर्यंत सर्वाधिक 67 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Ratnagiri Corona Cases Update

संबंधित बातम्या :

Gold Purchase | दुकाने सुरु होताच बारामतीकरांची सराफा दुकानात गर्दी, एकाच दिवसात 30000000 रुपयांची सोने खरेदी

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर, 24 तासात 32 पॉझिटिव्ह, कुठे किती रुग्ण?

कोल्हापुरात आतापर्यंत 1 लाख नागरिकांचा प्रवेश, आता मुंबई-पुण्यातून येणाऱ्यांना प्रवेश नको : पालकमंत्री

Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, आकडा 360 वर