नवी दिल्ली : बर्थडे पार्टीत मजा-मस्ती करता करता ‘बर्थडे बॉय’चाच मृत्यू झाला तर…? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीनुसार, एका तरुणाला काही इतर तरुण लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. मारहाण करणारे तरुण हसत सुद्धा आहेत. ही घटना जिथे घडतेय, तिथे बाजूलाच टेबलावर केक दिसत आहे. मारहाणीनंतर तरुण थरथरत उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडीओ तिथेच संपतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडीओ शेअर करताना अनेकजण सांगत आहेत की, ज्याला मारहाण केली जात होती, त्या तरुणाचा वाढदिवस होता. हे तरुण वाढदिवासाचे ‘बर्थडे बम्प’ देत होते आणि त्यात ‘बर्थडे बॉय’चा मृत्यू झाला, असे व्हिडीओच्या माध्यमातून पसरवले जात आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याच्यासह अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत, ‘बर्थडे बम्प’मुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचेच म्हटले आहे. ट्विटर आणि फेसबुकवर हजारो जणांनी व्हिडीओ शेअर केला आहे. कुणी त्या मुलाबाबत सहानुभूती दाखवत आहे, तर कुणी मारहाण करणाऱ्या तरुणांबाबत चीड व्यक्त करत आहे.
IIM के एक छात्र की मौत हो गई। वजह थी, उनके बर्थडे पर, दोस्तों द्वारा दिए जाने वाले BIRTHDAY BUMP । ” अगले दिन उन्हें पेट में दर्द हुआ, अग्न्याशय क्षतिग्रस्त हो गया, ऑपरेशन किया गया और उनकी मृत्यु हो गई। pic.twitter.com/cYRY2K2D6n
— Meet Doshi ❁ (@viratian_meet18) May 2, 2019
इंडिया टुडेने या व्हिडीओची सत्यता तपासली असून, या व्हिडीओतील मार खाणाता तरुण सुखरुप आहे. किंबहुना, या तरुणाने ‘इंडिया टुडे’शी बातचीत सुद्धा केली.
विशेष म्हणजे, माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागच्या ट्वीटवर डॉ. रघुराज सिंग यांनी रिप्लाय दिला असून, त्यात त्यांनी म्हटलंय की, ही फेक न्यूज असून, तो तरुण आमच्या कॉलेजमधील आहे व तो पूर्णपणे सुखरुप आहे.
इंडिया टुडेने डॉ. रघुराज सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा रघुराज यांच्याशी संपर्क झाला नाही. मात्र, रघुराज यांच्या फेसबुक प्रोफाईलवरील फोटोमध्ये मार खाणारा तरुणही आहे. याच तरुणांमधील दीपक या तरुणाशी इंडिया टुडेने संपर्क साधला होता. त्याच्या माहितीनुसार, किर्गिस्तानची राजधानी बिशकेक येथील कॉलेजमध्ये हे सर्व तरुण शिकतात. हा 2018 चा व्हिडीओ असून, वाढदिवसानिमित्तच हा प्रकार झाला होता. मात्र, त्यात मार खाणाऱ्या तरुणाला कुठलीही गंभीर दुखापत झाली नव्हती. तो पूर्णपणे ठीक आहे.