रियाने सुशांतच्या बँक खात्यातील 3 कोटी रुपये खर्च केल्याचं उघड

| Updated on: Aug 02, 2020 | 12:25 AM

बँक डिटेल्सनुसार, रियाने फक्त स्वत: साठीच नाही, तर आपल्या भावासाठीही सुशांतचे पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे (Rhea Chakraborty Used Sushant Money For Multiple Transactions).

रियाने सुशांतच्या बँक खात्यातील 3 कोटी रुपये खर्च केल्याचं उघड
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि ईडी या तीनही तपास यंत्रणा पुराव्यांचा शोध घेत आहेत. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. रियाने सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, बँक डिटेल्सनुसार रियाने फक्त स्वत: साठीच नाही, तर आपल्या भावासाठीही सुशांतचे पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे (Rhea Chakraborty Used Sushant Money For Multiple Transactions).

सुशांतच्या एका बँक डिटेल्सनुसार, 14 ऑक्टोबर 2019 रोजी त्याच्या बँक खात्यात 4 कोटी 70 लाख रुपये होते. त्याचदिवशी रियाने भाऊ शोविकच्या खात्यात विमानाच्या तिकिटासाठी 81 हजार 900 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 2019 रोजी रियाने भावाच्या हॉटेलचा खर्चासाठी सुशांतच्या खात्यातून 4 लाख 70 हजारांचं बिल दिलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

रियाने 16 ऑक्टोबर 2019 रोजी तिचं आणि भाऊ शोविकच्या विमानाच्या तिकीटाचे 76 हजार रुपये सुशांतच्याच बँक खात्यातून दिले. रियाने 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी मेकअप खरेदीसाठी 75 हजार रुपये सुशांतच्याच बँक खात्यातून खर्च केले. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून सुशांतने रिया आणि तिच्या भावावर 3 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे (Rhea Chakraborty Used Sushant Money For Multiple Transactions).

याप्रकरणी ईडीकडून मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. तर मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असाही संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पोलीस आपल्या तपासावर ठाम आहे. तर बिहार पोलिसांना शंका आहे. आणि त्यावरुनच तपासावरुन संघर्ष पाहायला मिळत आहे.

मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना सहकार्य केलं जात नसल्याचा आरोप केला जात आहे. बिहार पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनला जाऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, मुंबई पोलिसांनी तपासाशी संबंधित कागदपत्रे देण्यास नकार दिला.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दुसरीकडे शुक्रवारी (31 जुलै) मुंबई पोलिसांशी चर्चा केल्यानंतर बिहार पोलीस पत्रकारांशी बोलत असताना, मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना रोखलं, त्यानंतर ते बिहार पोलिसांना आपल्या व्हॅनमध्ये घेऊन गेले. यावरुनच ठाकरे सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करतंय? असा सवाल बिहारमधील भाजपचे नेते करत आहेत.

याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावली आहे. मात्र भाजपकडून वारंवार CBI चौकशीची मागणी सुरु आहे. तर सुशांतची बहिण श्वेता सिंहने आता पंतप्रधान मोदींनाच या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा : सुशांतचा नोकर सॅम्युअल मिरांडाच्या घराबाहेर मुंबई पोलीस तैनात, बिहार पोलिसांकडूनही तपासाचा धडाका सुरुच

“माझं मन मला सांगतंय की, पंतप्रधान मोदी नेहमीच सत्यासोबत आणि सत्यासाठी उभे राहतात. आम्ही खूप सामान्य कुटुंबातून आलो आहोत. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याचा कुणीही गॉडफादर नव्हता. आमचाही आत्ता कुणी गॉडफादर नाही. तुम्ही तातडीने या प्रकरणात लक्ष घालावं, अशी माझी विनंती आहे. तसंच या प्रकरणाचा तपास योग्यरितीने व्हावा, पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये याकडे लक्ष द्यावे. मला न्यायाची अपेक्षा आहे”, असं श्वेता सिंह म्हणाली आहे.

संबंधित बातम्या :

रियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती

बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज

Sushant Singh Rajput Suicide | माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्यमेव जयते, रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया