मुंबई : रिक्षातून प्रवाशांना लुबाडणाऱ्या आरोपीला गोरेगाव पूर्वच्या आरे पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक आरोपीचं नाव ओमप्रकाश तिवारी (वय 45) आहे. तर या कामात त्याला सहकार्य करणाऱ्या त्याचा सहकारी संजीव मिश्रा (48) या इसमालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत (Rickshaw Driver looted passenger woman).
आरे पोलिसात 7 मार्च 2020 रोजी एका महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या महिलेने मीरा रोड येथून कुर्ला टर्मिनस जाण्यासाठी रिक्शा पकडली होती. त्यावेळी रिक्षाचालक ओमप्रकाश मिश्राने आरे कॉलनी येथे पाण्याची तहान लागल्याचे कारण देत रिक्षा थांबवली.
रिक्षा चालकाने गोडबोलून महिलेला कोल्ड्रड्रिंक प्यायला लावलं. त्यामध्ये त्याने बेशुद्ध करण्याचं औषध मिळवलं होतं. रिक्षाचालक महिलेला बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर सोडून गेला. याशिवाय त्याने महिलेचा मोबाईल, बॅगेतील सर्व पैसे घेऊन तो लंपास झाला.
महिलेने शुद्धीवर आल्यावर तातडीने आरे पोलिसात तक्रार दाखल केली. आपल्या बॅगेतील 80 हजार रुपये, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू रिक्षाचालकाने लुटून नेल्याची तक्रार महिलेने केली होती.
महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. अखेर जवळपास सात महिन्यांनी पोलिसांना चोराला पकडण्यात यश आलं. पोलिसांनी रिक्षाचालक तिवारीकडून 15 हजार रुपये जप्त केले आहेत. तर रिक्षाचालकाचा सहकारी मिश्राकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत.
रिक्षाचालक तिवारीवर याआधी 2012 साली काशिमिरी पोलीस, 2015 साली वालीव पोलीस स्टेशन आणि कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये लूटीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती आरे पोलिसांनी दिली.
हेही वाचा :
कल्याणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर ड्रग्ज माफियांचा प्राणघातक हल्ला, चौघांना अटक
मटणाच्या दुकानातून चाकू चोरीला, एकाचा खून, चौघे जखमी, बंगळुरुत माथेफिरुला अटक