नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका व्हिडीओ अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवले आहेत. या व्हिडीओत बाईकस्वार तरुण-तरुणी वेगवान बाईकवरच एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. दिल्लीतील आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी 18 सेकंदाचा व्हिडीओ आपल्या ट्विटवरुन शेअर केला आहे.
धक्कादायक म्हणजे, तरुणी मागच्या सीटवर न बसता, बाईकच्या पेट्रोल टँकवर बसली आहे. दिल्लीतील राजौरी गार्डन क्रॉसिंगजवळील हा सर्व प्रकार आहे.
आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी तरुण-तरुणीचा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलंय की, मोटर व्हेईकलसाठी नव्या कायद्याची गरज आहे. एचजीएस धालीवाल यांनी व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर, व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Need for new sections for #MV Act violations!! #Rajouri garden crossing. pic.twitter.com/0gn7LsIIYM
— HGS Dhaliwal IPS (@hgsdhaliwalips) May 2, 2019
आयपीएस धालीवाल यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये तरुण-तरुणीचे चेहरे किंवा बाईकचा नंबर सुद्धा नीट दिसत नाही. मात्र, तरुण बाईक चालवत असून, चालत्या बाईकवर तरुणी तरुणाच्या पुढे पेट्रोल टँकवर बसून तरुणाला मिठी मारत होती. ज्या रस्त्यावरुन हे बाईकस्वार तरुण-तरुणी बाईक नेत होते, त्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या.
दिल्ली पोलिसांनी या व्हिडीओच्या माध्यमातून तपास सुरु केला आहे. दिल्लीतील पश्चिम विभागाच्या डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी आवाहन केले आहे की, व्हिडीओ शूट करणाऱ्याने पुढे यावं आणि या घटनेबद्दल आणखी माहिती द्यावी, जेणेकरुन तपासात मोठी मदत होईल.
दरम्यान, तूर्तास या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात तरुण-तरुणीविरोधात आयपीसी सेक्शन 279 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.