पुणे: सावित्रीबाीई फुले पुणे विद्यापाठाची बॅकलॉगची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. 8 ते 23 डिसेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या परीक्षेला 2 लाख 18 हजार विद्यार्थी बसणार असून विद्यापीठाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली आहे. (savitribai phule pune university backlog examination from tomorrow)
बॅकलॉग परीक्षेच्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर उद्यापासून विद्यार्थ्यांना थेट मुख्य परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. एकूण तीन जिल्ह्यातील विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यानंतर बॅकलॉग व श्रेणी सुधार करण्यासाठी परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. विद्यापीठाने अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा घेतली होती. यावेळी अनेक अडचणी आल्या होत्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या बॅकलॉगच्या परीक्षेत या अडचणी येऊ नयेत म्हणून विद्यापीठाने सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लॉग इन होते का? त्यांचे मेल आयडी व्यवस्थित आहेत का? परीक्षा पेपर ब्लर तर दिसत नाही ना?, पेपर ओपन होतो का? टायपिंग करताना काही अडचणी तर येत नाही ना? आदी गोष्टींच्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बॅकलॉगच्या परीक्षेत सुमारे 2,200 वियांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला दोन लाख 18 हजार बसणार आहेत. तर 2013च्या पॅटर्नच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाच्या बॅकलॉगच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार आहेत. (savitribai phule pune university backlog examination from tomorrow)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 7 December 2020 https://t.co/vMwFDvHWQK #Maharashtra #Mahafast #News
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
संबंधित बातम्या:
उदय सामंतांची प्राध्यापकांसाठी मोठी घोषणा, तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार
‘इग्नू’तील ऑनलाईन प्रवेशाची तारीख वाढवली; 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार
जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : दत्तात्रय भरणे
(savitribai phule pune university backlog examination from tomorrow)