2018 TET Scam | 2018 च्या टीईटी परीक्षेतही घोटाळा, कोरे ओएमआर रंगवायचे, बनावट प्रमाणपत्रही दिली: अमिताभ गुप्ता

| Updated on: Dec 21, 2021 | 1:49 PM

विद्यार्थ्यांना ओएमआर कोरं ठेवायला लावायचे. त्यानंतर ओएमआरमध्ये बदल करायचे यातून कोणी सुटून गेल्यास नापासला पास दाखवायचे. याप्रकारे विद्यार्थ्यांना पास दाखवायचे अशी माहिती गुप्ता यांनी दिली आहे.  हा प्रकार जवळपास  500 लोकांबद्दल झाला आहे. काही जणांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आलं होतं.

2018 TET Scam | 2018 च्या टीईटी परीक्षेतही घोटाळा, कोरे ओएमआर रंगवायचे, बनावट प्रमाणपत्रही दिली: अमिताभ गुप्ता
amitabh gupta
Follow us on

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्याचे जाळे दिवसेंदिवस वाढतच असतानाचा, आता 2018 च्या टीईटी परीक्षेतील घोटाळा उघड झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी आता 2018 च्या घोटाळ्यातील आरोपी सुखदेव डेरे यांना अटक केल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

यावेळी झाली पपरीक्षा
ही परीक्षा 15 जुलै 2018 ला परीक्षा झाली तर निकाल 12 ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्यावेळची परीक्षा नियंत्रक म्हणून सुखदेव डेरे यांच्याकडे चार्ज होता. आम्ही त्यांना अटक केली आहे. यापूर्वीच आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी घोटाळा प्रकरणी जी ए टेक्नॉलॉजीचे आश्विनकुमार होते, त्यांना अटक केली आहे. प्रीतिश देशमुख, हरकळचे दोन्ही भाऊ आणि  सावरीकर यांना अटक केली असल्याची महितीनी त्यांनी दिली आहे.

असे करायचे पास

या परीक्षेतही पैसे घेतलेल्या विद्यार्थ्यांना ओएमआर कोरं ठेवायला लावायचे . त्यानंतर ओएमआरमध्ये बदल करायचे यातून कोणी सुटून गेल्यास नापासला पास दाखवायचे. याप्रकारे विद्यार्थ्यांना पास दाखवायचे अशी माहिती गुप्ता यांनी दिली आहे.  हा प्रकार जवळपास  500 लोकांबद्दल झाला आहे. काही जणांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. अशी माहिती  त्यांनी दिली आहे.

लॅपटॉप मधून माहिती झाली उघड
यातिला आरोपी सुखदेव डेरे दोन ते तीन वर्ष निवृत्त झालेले होते. 2018 च्या प्रकरणासंदर्भात आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे. 2018 ला देखील या प्रकरणी तक्रार झाली होती. मात्र प्रकरण लॉजिकल एंडला गेले नव्हते. सुखदेव डेरे त्यावेळी प्रमुख होते. त्यानंतर तुकाराम सुपेकडे काही वेळ चार्ज होता.आता  झालेल्या तक्रारीचा तपास करताना हा घोटाळा समोर आला आहे. काल आम्ही रात्री सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही ज्यांना अटक केली आहे त्यातून लॅपटॉप मिळाला त्यातून ही लिंक पुढे आली आहे. तुकाराम सुपे आणि प्रीतिश देशमुख यांच्याकडे केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 500 लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार 5 कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे. सुखदेव डेरे दोन ते तीन वर्ष निवृत्त झालेले होते. 2018 च्या प्रकरणासंदर्भात आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे.

देवस्थानाच्या जमिनी हडपल्या, भाजपच्या सुरेश धस यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; नवाब मलिकांचे आरोप काय?

नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार, ‘स्टार प्रवाह धुमधडाका 2022’ कलाकारांच्या परफॉर्मन्सने रंगणार!

Central Godavari | नाशिकच्या सेंट्रल गोदावरी संस्थेवर माजी खासदारांची सत्ता; प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवून आपला पॅनल विजयी