नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या सीमा वादानंतर आजा राफेल विमानांची दुसरा फेरी बुधवारी रात्री भारतात दाखल झाली आहे. यामध्ये 3 राफेल विमानं दाखल झाली आहेत. ही तीन विमाने थेट फ्रान्समधून भारतात आली आहेत. यामुळे आता सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाची ताकद अजून वाढणार आहे. ही विमान भारतात दाखल झाल्याचा व्हीडिओदेखील समोर आला आहे. (second batch of Rafale aircraft arrived in India today from France)
मिळालेल्या माहितीनुसार, हे 3 राफेल विमान भारतात दाखल होताना रस्त्यात कुठेच इंधन भरणार नाहीत, अशी माहिती भारतीय वायू दलातील अधिकाऱ्यांनी दिली होती. आता ही विमानं जामनगरमध्ये एक दिवस मुक्काम करतील. त्यानंतर ती अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहेत. महिनाभरापूर्वी भारतीय वायूसेनेची एक टीम फ्रान्समध्ये या विमानांची समिक्षा करण्यासाठी फ्रान्सला गेली होती.
फ्रान्स आणि भारतात एकूण 36 राफेल विमानांचा करार झाला आहे. यातील 5 राफेल विमानं 29 जुलैला अंबाला एअरबेसवर दाखल झाली होती. त्यानंतर 10 सप्टेंबरला त्यासंबंधी औपचारिक कार्यक्रम घेण्यात आला. फ्रान्सने भारताला दर 2 महिन्यात 3 ते 4 राफेल विमान देण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार 36 राफेल विमान भारतीय वायूसेनेची ताकद वाढवणार आहेत.
#WATCH: The second batch of #Rafale aircraft arrived in India at 8:14 pm today after flying non-stop from France.
(Video Source: Office of Defence Minister Twitter) pic.twitter.com/lklY7UGh7Z
— ANI (@ANI) November 4, 2020
सध्या चीन आणि पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर कुरघोडी सुरुच आहे. लडाख सीमेवरील चीनच्या घुसखोरीचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राफेल भारतात दाखल झाल्याने भारतीय वायू दलाची ताकद अधिक वाढणार आहे. (second batch of Rafale aircraft arrived in India today from France)
लडाख सीमेवर राफेल तैनात
यापूर्वी जून 1997 मध्ये भारताने रशियाकडून 30 सुखोई विमानं खरेदी केली होती. त्यानं जवळपास 23 वर्षांनी भारताने फ्रान्सकडून राफेलसारख्या अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमानांची खरेदी केली आहे. भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेने लडाख सीमेवर राफेल तैनात केले आहेत.
राफेल विमानाची वैशिष्ट्ये
– राफेल हे 2 इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान
– लांब असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या दृष्टीनं राफेलची निर्मिती
– हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं,
– अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता
– हवेत 150 किलोमीटरपर्यंत तर हवेतून जमिनीवर 300 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची अण्वस्त्रसज्ज राफेलची क्षमता
इतर बातम्या –
US election 2020 : हँड सॅनिटायझरमुळे अमेरिकेच्या निवडणुकीत बॅलेट स्कॅनर झालं जाम, तासभर मतदान रखडलं
चप्पूवरून प्रवास करताना तिघांचा मृत्यू, त्याच चप्पूवरुन प्रवास करून आमदार धस यांचा कुटुंबाला धीर
(second batch of Rafale aircraft arrived in India today from France)