कोल्हापूर : अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या ‘कोठारे व्हिजन’च्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ (Dakhkhancha Raja Jyotiba) या मालिकेसंदर्भातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे. मुंबईत (Mumbai) या मालिकेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यातून सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. समस्त पुजारी, अभ्यासक, शालिनी ठाकरे आणि महेश कोठारे यांच्यात ही बैठक पार पडली. (Settlement on the controversy over Dakhkhancha Raja Jyotiba series positive discussion in Mumbai meeting)
मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. पण त्यावर योग्य चर्चा करण्यात आली. यानंतर मालिकेला विरोध नाही पण कथानकात बदल केल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला. तर मालिकेत योग्य तो बदल करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
काय होता नेमका वाद?
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तसेच ‘कोठारे प्रॉडक्शन’चे सर्वेसर्वा महेश कोठारे यांनी दिशाभूल केल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला होता. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ग्रामपंचायतीकडून परवानगीही घेतली नसल्याचा दावा ग्रामस्थांनकडून करण्यात आला. शिवाय मालिकेचे कथानक जर, केदार विजय ग्रंथानुसार बदलले गेले, तरच चित्रीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ज्योतिबा ग्रामस्थांनी केली. (Settlement on the controversy over Dakhkhancha Raja Jyotiba series positive discussion in Mumbai meeting)
या आधीही बंदीची मागणी
या आधीही स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या कथानकावर जोतिबा ग्रामस्थांनी आक्षेप घेत कथानकात बदल करण्यास सांगितले होते. या मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले होते. कथानकात योग्य ते बदल करूनच मालिका सुरू करा, असे आवाहन ग्रामस्थांकडून ‘कोठारे व्हिजन’ला करण्यात आले होते. योग्य इतिहास दाखवला जात नाही, तोपर्यंत मालिका बंद ठेवण्यासाठीचे निवेदन ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीला सादर करण्यात आले होते. या आधीही बंदीची मागणी
या आधीही स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या कथानकावर जोतिबा ग्रामस्थांनी आक्षेप घेत कथानकात बदल करण्यास सांगितले होते. या मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले होते. कथानकात योग्य ते बदल करूनच मालिका सुरू करा, असे आवाहन ग्रामस्थांकडून ‘कोठारे व्हिजन’ला करण्यात आले होते. योग्य इतिहास दाखवला जात नाही, तोपर्यंत मालिका बंद ठेवण्यासाठीचे निवेदन ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीला सादर करण्यात आले होते. (Angry Jyotiba Villegers stop shooting of Dakhkhancha Raja Jyotiba)
महाराष्ट्राचं लोकदैवत ‘ज्योतिबा’
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ म्हणजे महाराष्ट्राचं लोकदैवत. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त आपल्या लाडक्या दैवताला साकडं घालतात. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. ‘कोठारे व्हिजन’च्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे आपल्या लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस पूर्ण झाली आहे. या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होत आहे.
विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग सुरू आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे.
इतर बातम्या –
Dakhkhancha Raja Jyotiba | ‘दख्खनचा राजा…’ मालिकेचे चित्रीकरण बंद करा, ज्योतिबा ग्रामस्थांचा उद्रेक!
जाणून घ्या, ‘का आवडते ज्योतिबाला पुरणपोळी… ?’
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’
बुध. ४ नोव्हेंबर सायं. ६:३० वा. Star प्रवाह वर.#DakhkhanchaRajaJyotiba #StarPravah pic.twitter.com/OmktIBbvls— Star Pravah (@StarPravah) November 3, 2020
(Settlement on the controversy over Dakhkhancha Raja Jyotiba series positive discussion in Mumbai meeting)