‘भाजपचं नामोहरम करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंवर दबाव टाकू शकतात’

| Updated on: Oct 23, 2020 | 2:56 PM

भाजप हा शिवसेनेचा मोठा शत्रू असून भाजपला नामोहरम करण्यासाठी शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकू शकतात अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेशक संजय भोकरे यांनी दिली आहे.

भाजपचं नामोहरम करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंवर दबाव टाकू शकतात
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती.
Follow us on

मुंबई : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी त्यांना काय पद मिळणार यावर सध्या राजकीय वातावरण पेटलं आहे. खडसे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. मात्र त्यांना नेमकं कोणतं पद मिळणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. शिवसेना हे कृषीमंत्रीपद सोडायला तयार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडही आपलं मंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यामुळे महाविकासआघाडीतील अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. (Sharad Pawar can put pressure on Uddhav Thackeray to discredit BJP)

अशात शिवसेना आणि एकनाथ खडसे यांचा जुना वाद सगळ्यांनाच माहित आहेत. पण आता महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे भाजप हा शिवसेनेचा पहिला आणि मोठा शत्रू असून भाजपला नामोहरम करण्यासाठी शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकू शकतात अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेशक संजय भोकरे यांनी दिली आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा एकही आमदार, खासदार दिसणार नाही – अनिल पाटील

यामुळे आपला इगो आणि नाराजी बाजूला ठेवत शिवसेना खडसेंना पद देणार का असा सवालही संजय भोकरे यांनी उपस्थित केला आहे. यात दादा भूसे खडसेंसाठी पद सोडण्यासाठी तयार असल्याची चिन्ह आहेत. कारण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे असं दादा भूसे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे असंही संजय भोकरे म्हणाले. (Sharad Pawar can put pressure on Uddhav Thackeray to discredit BJP)

खरंतर, 2014 साली घटस्थापनेच्या काही दिवसांआधी एकनाथ खडसे यांनी भाजप-शिवसेना युती तुटल्याची घोषणा केली होती. 25 वर्षांची भाजप आणि शिवसेनेची मैत्री संपुष्टात आल्याचं खडसेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. तेव्हापासून शिवसेना खडसेंवर नाराज आहे. शिवसेनेच्या मागण्यांमुळे ही युती संपली होती. त्यामुळे खडसे आणि शिवसेनेत अंतर वाढत गेलं.

‘शिवसेना इगो सोडून खडसेंसाठी पद देणार का?’ वाचा INSIDE STORY

अशात आता महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे आपला इगो बाजूला ठेवून शिवसेना आपलं पद खडसेंसाठी देणार का ? हा मोठा प्रश्न आहे. तर यामध्ये दुसरी बाजू अशी की भाजपशी काडीमोड झाल्यानंतर शिवसेना सगळ्यात मोठा शत्रू आता भाजपच आहे.

खडसेंच्या राजीनाम्यामुळे भाजपला आधीच दणका बसला आहे. पण आता भाजप सरकारला नामोहरम करण्यासाठी शिवसेना खडसेंना जागा देतीला का? किंवा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकणार का? असे प्रश्न संजय भोकरे यांनी उपस्थित केले आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू

(Sharad Pawar can put pressure on Uddhav Thackeray to discredit BJP)