मुंबई : चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Sharad Pawar on PM Modi All Party Meet) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या बैठकीत विरोधकांनी आपण सरकारसोबत असून, चीनविरोधात सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं आश्वासन दिलं (Sharad Pawar on PM Modi All Party Meet).
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
भारताचा संरक्षणमंत्री असताना मी 1993 साली चीनला भेट दिली होती. यावेळी चीनबरोबर शांतता करार केला होता. भारत-चीन 1962 सालाच्या युद्धानंतरचा 1993 साली हा पहिला प्रयत्न होता.
काही घटनांचा अपवाद वगळता दोन्ही देशांनी शांतता करारच्या अटींचा आदर राखला आहे. सीमाप्रश्नांशी संबंधित असलेल्या माझ्या भूतकाळातील अनुभवाच्या आधारे आणि उपलब्ध माहितीसह मी माझे विचार बैठकीत मांडले.
गेल्या तीन दशकांत, चीनने आपल्या सशस्त्र सैन्याने 4 हजार किमी एलएसीवर (वास्तविक नियंत्रण रेखा) शांतपणे आपले स्थान मजबूत केले आहे. त्यांनी विशेषत: पूर्व लडाख क्षेत्रातील विस्तार आणि बळकटीवर लक्ष केंद्रित केले आहे.
चीनने सीमारेषाला मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. चीनने 4 हजार किलोमीटरमध्ये अनेक साधने जमा केली आहेत. त्यामुळे भविष्यातही चीन अशाप्रकारचं कृत्य करु शकतो, ही गोष्ट नाकारता येत नाही.
डब्रुकलापासून डीबीओला जोडणारा रस्ता संपूर्णपणे नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूला आहे. भारतासाठी हा रोड महत्त्वपूर्ण आहे, कारण डीबीओला चांगला प्रगत लँडिंग ग्राउंड आहे. या भागात आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी हवाई दलाला एक चांगलं एअरफील्ड उपलब्ध आहे.
काराकोरम डोंगररांगा आणि डावीकडे सियाचिन ग्लेशियरला जोडल्याने डीबीओ देखील महत्त्वपूर्ण आहे.
चिनी सैन्याने लडाख सीमेवर भारतीय सैन्याने तयार केलेल्या डब्रुक-डीबीओ रोडवर वर्चस्व गाजवण्यासाठी गलवान खोऱ्याच्या मैदानी भागात घुसखोरी केली आहे. चिनी सैन्य कोणत्याही वेळी हा रस्ता बंद करण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेऊ शकते. या रस्त्यासाठी भारतीय लष्कराने प्रचंड पैसे खर्च केले आहेत.
चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्याच्या उंच भूभागावर कब्जा केला आहे. त्यांनी हा परिसर रिकामा करणं आवश्यक आहे. यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. सीमेवर ताणतणाव कमी करण्यासाठी आणि चीनची समजूत काढण्यासाठी राजकीय रणनिती आखणं जरुरीचं आहे
I shared my views based on the experiences on diplomatic solutions through a video conference with Hon. Prime Minister Shri Narendra Modi against the backdrop of the conflict between Indo-Chinese troops in the Galwan Valley of East Ladakh.@PMOIndia @narendramodi #GalwanValley pic.twitter.com/cXearOR7Bj
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 19, 2020
PLA must be evacuated from occupying high ground in Galwan Valley on the Indian side. If we want PLA to evacuate from Galwan, compulsory measures are required. It would be advisable to strategize using diplomatic channels to difuse tension on the border & make China see reason.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 19, 2020
संबंधित बातमी :
PM Modi All Party Meet Live | आम्ही सरकारसोबत, चिनी संघर्षावरुन सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचं आश्वासन