शिवसैनिकांनीच शिवसेनेचे पोस्टर फाडले असल्याचा प्रकार समोर आला आहे, राणेंच्या बालेकिल्ल्यात असं का घडलं? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रकाराने शिवसेनेतली गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे, पोस्टरवर उदय सामंत यांचा फोटो नसल्याने हा प्रकार घडला आहे, त्यामुळे अतर्गत बंडाळी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. कोकणात राणे आणि शिवसेना हे वैर कुणालाही लपलं नाही, पण आता शिवसेनेतली अंतर्गत खदखद समोर आली आहे.
सामंत पुन्हा टार्गेटवर
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पराभवानंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी पुन्हा चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे, कारण
सामंत यांचे अलिकडील निर्णय काय?
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठा आहे, अशात शासनाकडून काही धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत, परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त वसतिगृहाची व्यवस्था असेल कारण ते सध्या त्यांच्या मायदेशी परतणे अवघड आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देवून वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) विद्यार्थ्यांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेज 15 जानेवारीपर्यंत बंद राहतील, अशी देखील घोषणा केली.