Video | फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद, जहरी टीका कुणाची?

Video | फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद, जहरी टीका कुणाची?

| Updated on: Nov 25, 2022 | 4:03 PM

उद्याच्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष दिसून येईल, असे विनायक राऊत म्हणाले.

मुंबईः सत्तेत असताना वीज बिलाची माफी करायला पाहिजे, असे कोकलणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)… आता सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करावच लागेल, अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी खूपच संतापले आहेत. भाजपाची ही रंग बदलणारी औलाद आहे, अशी जहरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे उद्या मोठा शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी लाखो शेतकर्यांची उपस्थिती असणार आहे. या सभास्थळाची पाहणी करण्यासाठी विनायक राऊत आले होते. यावेळी त्यांनी सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सणकून टीका केली.  विनायक राऊत म्हणाले, विजेच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी खरे रूप दाखविले असून बिल भरावेच लागेल असे म्हटले.. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेच फडणवीस वीज बिल माफ करा म्हणत होते..उद्याच्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष दिसून येईल, असे विनायक राऊत म्हणाले.

 

Published on: Nov 25, 2022 03:52 PM