मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोणपाठोपाठ आता श्रद्धा कपूरनेही ड्रग्जचं सेवन केल्याचा इन्कार केला आहे. ‘छिछोरे’च्या पार्टीत गेले होते. पण पार्टीत ड्रग्ज घेतलं नाही, असं श्रद्धाने एनसीबीच्या चौकशीत म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं. (shraddha kapoor reaches ncb office )
श्रद्धा कपूर पावणे बाराच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया येथील एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली. श्रद्धा कपूर एकटीच एनसीबी कार्यालयात आली होती. तिचीही एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ड्रग्ज सेवन आणि बॉलिवूड पार्ट्यांमध्ये होणारा ड्रग्जचा वापर याबाबत श्रद्धाची चौकशी होणार आहे. एनसीबीने श्रद्धाला विचारण्यासाठी प्रश्नांची यादी तयार करण्यात केली असून या यादीनुसारच तिला प्रश्न विचारले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
चौकशी दरम्यान श्रद्धाचा फोनही काढून घेतला जाणार असून तिला चौकशी दरम्यान कुणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नसल्याचं कळतं. तसेच तिची चौकशी किती वाजेपर्यंत चालेल याचीही काही माहिती देण्यात आली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. श्रद्धाने चौकशीला समाधानकारक उत्तरं दिल्यास तिला चौकशीसाठी परत बोलावलं जाणार नाही. मात्र, तिने एनसीबीच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरे न दिल्यास तिला पुन्हा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं, असंही सूत्रांनी सांगितलं. (shraddha kapoor reaches ncb office )
Drugs Case LIVE | अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल https://t.co/G4w4uAhvZK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2020
1) जया सहाला ओळखते का?
2) ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात आहे का? आणि कशी आली?
3) सुशांतच्या घरी किंवा फार्महाऊसवर पार्टी केली आहे का?
4) पावना डॅम येथील आयलेंड वर कधी ड्रग्ज पार्टीला गेली होती?
5) कधी ड्रग्जचं सेवन केल आहे का?
6) फिल्म छिछोरेच्या वेळी कधी ड्रग्जचं सेवन केल आहे का?
7) सुशांतशी मैत्री कधी झाली?
8) जगदीशने जबाब दिला आहे की श्रद्धा सुद्धा ड्रग्जपार्टीमध्ये असायची त्या जबाबाच्या आधारित प्रश्न विचारण्यात येणार. काय झालं होतं? कोण कोण होतं पार्टीमध्ये?
9) सुशांत ड्रग्ज घेत होत का? कोण आणून देत होतं?
10) बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भात प्रश्न असतील?
संबंधित बातम्या:
दीपिकाची चौकशी संध्याकाळपर्यंत चालणार; ‘हा’ मराठमोळा अधिकारी करणार तपास
सारा अली खानही घरी नाही; एनसीबी कार्यालयात दीड तास उशिराने पोहोचणार
(shraddha kapoor reaches ncb office )
पाहा: बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणाच्या लाइव्ह घडामोडी