मुंबई : ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. बॉलिवूड कलाकारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदतीचा हात दिला आहे. अभिनेता अजय देवगन याने ट्वीट करत मुंबई पोलिसांच्या जोडीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. (Ajay Devgn assures Mumbai Police to stand during Corona epidemic)
‘प्रिय मुंबई पोलिस, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. कोविड 19 साथीच्या काळात तुमचे योगदान अतुलनीय आहे. आपण हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली ‘खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र’ असं ट्वीट अजय देवगण याने केलं आहे.
Dear Mumbai Police, you are known as one of the BEST in the world. Your contribution to the COVID-19 pandemic is unparalleled. Singham will wear his Khakee and stand beside you whenever you ask. Jai Hind, Jai Maharashtra ?@CPMumbaiPolice @MumbaiPolice
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 9, 2020
कोरोनाविरोधात लढण्यासाठी अजय देवगणनेची 25 कोटी 51 लाखांची मदत केली आहे. पीएम केअर फंडसाठी 15 कोटी, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी रुपयांचे योगदान त्याने दिले आहे.
गेल्या आठवड्यात अजयने ‘FWICE’ अर्थात फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइज’ला 51 लाखांची मदत केली होती. बॉलिवूडमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या, म्हणजेच हातावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्याने 51 लाखांची रक्कम दिली होती.
Dear @ajaydevgn, we thank U for your generous contribution of ₹51 lakhs towards @fwice_mum, for the benefit of our 5 lakh #CineWorkers. U have proved time & again, especially in times of crisis, that U are a real life #Singham. God bless U.#FWICEFightsCorona #IndiaFightsCorona pic.twitter.com/e2NZ0V3q52
— Ashoke Pandit (@ashokepandit) April 1, 2020