सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे 6 मोठे बदल, 1 ऑगस्टपासून लागू

| Updated on: Jul 30, 2020 | 12:37 AM

आगामी काळात 1 ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे 6 मोठे बदल होणार आहेत (Six Big changes from 1 August).

सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे 6 मोठे बदल, 1 ऑगस्टपासून लागू
या गाईडलाईन्स पैसे घेणे आणि देण्यासंबंधी तयार करण्यात आल्या आहेत. ज्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.
Follow us on

नवी दिल्ली : आगामी काळात 1 ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे 6 मोठे बदल होणार आहेत (Six Big changes from 1 August). हे बदल तुमचं बँक खातं, स्वयंपाकाचा गॅसपासून गाडीच्या विम्याच्या हप्त्यांपर्यंत होणार आहेत. त्यामुळे हे 6 बदल आणि त्याबाबत झालेल्या नियमांमधील बदल समजून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. कोरोना काळात पुढील महिनाभराचं नियोजन आधीच करुन घ्या. यात कोठे खर्च करायचा आणि कोठे खर्च टाळायचा हेही ठरवण्यास मदत होईल.

स्वयंपाक गॅसच्या किमती

तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG घरगुती गॅस सिलेंडर आणि हवाई इंधनाच्या किमतीची घोषणा करतात. मागील काही महिन्यांपासून इंधनाच्या किमतीत वाढ झालेली दिसली. 1 ऑगस्टला LPG च्या किमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक आणि आर्थिक पातळीवर तयार रहावं लागणार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या बँकांमध्ये कमीत कमी बॅलन्स ठेवणं गरजेचं

रोख रकमेचा व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बँकांनी 1 ऑगस्टपासून ग्राहकांच्या बँक खात्यात कमीत कमी ठेवीवर शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. या बँकांमध्ये 3 मोफत व्यवहारांनंतर शुल्क आकारलं जाणार आहे. या शुल्क आकारणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra bank) आणि आरबीएल बँकेचा (RBL Bank) समावेश आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सेव्हिंग खातेधारकांना मेट्रो आणि शहरी भागात कमीत कमी 2,000 रुपये ठेव ठेवणं आवश्यक आहे. ही रक्कम आधी 1,500 रुपये होती. या रकमेपेक्षा कमी बॅलन्स असेल तर मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, अर्ध-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात 20 रुपये प्रति महिना शुल्क आकारलं जाणार आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

उत्पादन झालेल्या मूळ देशांची माहिती

ई-कॉमर्स कंपन्यांना (E-commerce companies) 1 ऑगस्टपासून आपल्या उत्पादनाच्या मूळ देशाची माहिती सांगणं आवश्यक असणार आहे. विक्रीसाठीचं उत्पादन कुठं तयार झालं, कुणी बनवलं इत्यादी तपशीलांची माहिती देणं यात अपेक्षित आहे. अनेक कंपन्यांनी याधीच ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

यात फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि स्नॅपडील सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने (DPIIT) सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना 1 ऑगस्टपर्यंत नव्या उत्पादनांची यादी त्यांच्या निर्मिती देशाच्या माहितीसह पाठवण्यास सांगितली आहे. मेक इन इंडिया प्रोडक्टला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

पीएम किसानचा सहावा हप्ता

1 ऑगस्टला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सहावा हप्ता मिळणार आहे. 1 ऑगस्टला मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा सहावा हप्ता जमा करेल. सरकारने या योजनेत आतापर्यंत देशातील 9.85 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट आर्थिक लाभ दिला आहे. या योजनेचा पाचवा हप्ता 1 एप्रिल 2020 ला आला होता.

हेही वाचा :

मुलींनाही भारतीय सैन्यात भरतीची सुवर्णसंधी, पुण्यासह देशातील 6 ठिकाणी भरती

71 वर्षीय कोरोना रुग्णाला डिस्चार्ज, नाशिक जिल्हा रुग्णालयाचा कारभार

आठवड्याला आयुक्तांची भेट, नवी मुंबईला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार, आमदार गणेश नाईक मैदानात

Six Big changes from 1 August