Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, आकडा 360 वर

| Updated on: May 16, 2020 | 6:49 PM

सोलापुरात शुक्रवारी (15 मे) सांयकाळी 7 पासून आज (16 मे) सकाळी 9 वाजेपर्यंत 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, आकडा 360 वर
Follow us on

सोलापूर : सोलापुरात आता कोरोनाबांधितांची (Solapur Corona Cases) संख्या 360 वर पोहोचली आहे. शुक्रवारी (15 मे) सांयकाळी 7 पासून आज (16 मे) सकाळी 9 वाजेपर्यंत 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 24 जणांना आपला जीव (Solapur Corona Cases) गमवावा लागला आहे.

आतापर्यंत 113 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत 3734 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 3370 चाचण्या या निगेटिव्ह झाल्या आहेत. त्यात 360 रुग्ण पॉजिटीव्ह आढळले आहेत.

सोलापुरातील शाश्त्रीनगर, तेलंगी पाछा पेठ, गवळी वस्ती, बापूजीनगर अशा दाटलोकवस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असतानाच आता कोरोनाने शहराचं मध्यभाग असलेल्या दत्तचौकात सुद्धा आपले हात-पाय पसरवले आहेत. त्यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढली आहे. शिवाय, सोलापूरनंतर अरविंद धाम पोलीस वसाहतीमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे पोलीस वसाहतीमधील (Solapur Corona Cases) बिल्डिंग सील करण्यात आली आहे.

सोलापूर शहरातील पाछा पेठेत सर्वाधिक 54, तर शास्त्रीनगरमध्ये 52 रुग्ण आहेत. त्यामुळे शहरातील हे दोन मोठे हॉटस्पॉट बनले आहेत.

शहरात एकीकडे रुग्णाची संख्या वाढत असताना दिलासा दायक बाब म्हणजे भागातील 6 रुग्णानंतर त्यांचा संपर्कात असणाऱ्या लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ग्रामीण भागात कोरोना संक्रमण तूर्तास तरी थांबल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या स्त्री रोग आणि प्रसूती विभागाने मागील दोन महिन्यात नऊ कोरोनाबाधित नऊ मातांची प्रसूती केली आहे. यात विशेष म्हणजे एकाही बाळाला कोरोनाची बाधा नाही. यातील दोन महिलांना उपचारानंतर घरी (Solapur Corona Cases) पाठवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Aurangabad Corona : सकाळी 30 रुग्ण वाढले, दुपारी 28, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 900 पार

कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू, एका दिवसात 79 पोलिसांना कोरोना, बाधितांची संख्या 1140 वर

Corona : पुणे 141, कोल्हापूर 7, औरंगाबाद 30, एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

कोरोनाने मृत्यू, मृतदेहाला आंघोळ घालणारे 10 जण पॉझिटिव्ह