मुलाने नाश्त्याची हातगाडी लावली नाही म्हणून वडिलांची आत्महत्या, थेट नदीपात्रात उडी

| Updated on: Nov 08, 2020 | 5:40 PM

याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Son did Not sell breakfast for one day Father committed suicide) 

मुलाने नाश्त्याची हातगाडी लावली नाही म्हणून वडिलांची आत्महत्या, थेट नदीपात्रात उडी
drowning
Follow us on

उल्हासनगर : स्वत:च्या मुलाने रोजच्याप्रमाणे एक दिवस नाश्ता विक्रीची हातगाडी लावली नाही, म्हणून वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कल्याण – मुरबाड मार्गावरील पांजरपोळ गावाच्या हद्दीतील रायते पुलाजवळ ही घटना घडली. मोहनदास मुरली जमाई (55) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Son did Not sell breakfast for one day Father committed suicide)

मोहनदास जमाई हे उल्हासनगर कॅम्प नंबर 2 परिसरातील खेमणी भागातील एका इमारतीत कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा अनिल (31) हा कुटुंबाच्या उदरर्निवाहसाठी घराजवळच हातगाडीवर नाश्ता विक्रीचा छोटासा व्यवसाय करतो. मात्र गुरुवारी 5 नोव्हेंबरला अनिलने काही कारणामुळे नाश्ता विक्रीची गाडी लावली नाही.

यामुळे त्याचे वडील मोहनदास जमाई प्रचंड निराश झाले. त्यानंतर त्यांनी 6 नोव्हेंबरला कल्याण-मुरबाड मार्गावरील कल्याण तालुक्यातील पांजरपोळ गावच्या हद्दीत असलेल्या रायते पुलाखाली नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी कल्याण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोहनादास यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. यावेळी त्यांच्या खिशातील कागदपत्रावरुन त्यांची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता, त्यांनी घडलेला सर्व प्रकार समजला. मुलाने नाश्ता विक्रीची हातगाडी लावली नाही म्हणून मोहनदास यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांपुढे स्पष्ट झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे. (Son did Not sell breakfast for one day Father committed suicide)

संबंधित बातम्या : 

डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ

दाटीवाटीच्या लोकवस्तीत बिस्कीटच्या दुकानाआड फटाक्यांची विक्री, दीड लाखांचे फटाके जप्त