भूषण कुमार, चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास, तोंड उघडायला लावलंस, तर ‘तो’ व्हिडीओ अपलोड करेन : सोनू निगम

| Updated on: Jun 22, 2020 | 4:28 PM

माझ्या नादी लागू नकोस, नाहीतर मरिना कंवरचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबवर अपलोड करेन. माझं तोंड उघडायला लावू नकोस, असा इशारा सोनूने दिला आहे. (Sonu Nigam lashes out on T-Series chief Bhushan Kumar)

भूषण कुमार, चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास, तोंड उघडायला लावलंस, तर तो व्हिडीओ अपलोड करेन : सोनू निगम
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमने ‘टी-सीरिज’चे सर्वेसर्वा भूषण कुमार यांच्यावर ‘म्युझिक माफिया’ असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. आपल्याशी पंगा घेऊ नकोस, अन्यथा तुझे काळे धंदे उघड करेन, असा थेट इशारा सोनूने दिला. भूषण कुमार हे दिवंगत गायक गुलशन कुमार यांचे पुत्र. (Sonu Nigam lashes out on T-Series chief Bhushan Kumar)

“भूषण कुमार, आता तर मला तुझं नाव घ्यावंच लागेल आणि तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहेस. तू विसरलास ती वेळ, जेव्हा तू माझ्या घरी यायचास… भाई भाई माझा अल्बम कर… भाई ‘दिवाना’ कर… भाई माझी ‘सहाराश्री’सोबत भेट घालून दे, भाई स्मिता ठाकरेंशी भेट घाल, भाई बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गाठभेट घालून दे.. भाई अबू सालेमपासून मला वाचव. भाई अबू सालेम मला शिव्या देतोय.. आठवतय का काही?” असा सवाल सोनू निगमने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विचारला आहे.

हेही वाचा : सुशांतप्रमाणे अनेक गायकही आत्महत्या करु शकतात, सोनू निगमचे म्युझिक कंपन्यांवर गंभीर आरोप

“माझ्या तोंडी लागू नकोस, मरिना कंवर आठवते का? ती का बोलली आणि मागे हटली माहीत आहे? मला माहिती आहे, मीडियाला माहीत आहे. माझ्याकडे तिचा व्हिडीओ आहे. माझ्या नादी लागू नकोस, नाहीतर तिचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबवर अपलोड करेन. एकदम धडाक्यात टाकेन. माझं तोंड उघडायला लावू नकोस” असा इशारा सोनूने दिला आहे.

2018 मध्ये, मरिना कंवर ‘आज तक’च्या मुलाखतीदरम्यान भूषण कुमार आणि साजिद खानवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.

दोनच दिवसांपूर्वी सोनूने नाव न घेता दोन बड्या म्युझिक कंपन्यांवर टीका केली होती. “आज एका अभिनेत्याने आत्महत्या केली. उद्या कदाचित एखादा गायक किंवा संगीतकाराच्या आत्महत्येची बातमी येईल. संगीत क्षेत्रातील माफिया हे चित्रपट क्षेत्रांपेक्षाही खतरनाक आहेत. सध्या वातावरण फार वाईट आहे. व्यवसाय करणं ठिक आहे. मात्र, अशाप्रकारची वागणूक देणं चुकीचं आहे. मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा मी फार लहान होतो. त्यामुळे मी यातून निघून गेलो. मात्र, संगीत क्षेत्रात येणाऱ्या नव्या मुलांना त्रास भोगावा लागत आहे. संगीत क्षेत्राची ताकद सध्या दोन लोकांच्या हातात आहे. कोणत्या गायकाला घ्यायचं किंवा घ्यायचं नाही, हे ते ठरवतात. मात्र, असं करु नका. अनेक गायकांशी माझी दररोज चर्चा होते. ते खूप त्रस्त आहेत. कारण आज संगीत क्षेत्राची ताकद फक्त दोन कंपन्यांकडे आहे.” असा आरोप त्याने केला होता. (Sonu Nigam lashes out on T-Series chief Bhushan Kumar)