नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊनपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सामान्य नागरिकांमध्ये चांगला प्रसिद्ध झाला. त्याने या जीवघेण्या काळात अनेकांना मदत केली. सोनूने लोकांना मदत करण्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय शोधून काढला आहे. सोनू सूदने परदेशात काम करमाऱ्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. बॉलिवूडचा हा पॉप्यूलर स्टार सगळ्यांच्याच मदतीला धावून जात असतो. आताही त्याने असंच अनोखं काम केलं आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांनाही आता सोनू सूद मदत करणार आहे. (soon sood will help people to start business with zero investment here know all details)
खरंतर, सोनू सूदने बेरोजगार तरुणांसाठी एक नवीन योजना आणली आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे पैसे नसतील असेही लोक आता त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. कारण आर्थिक पाठबळ नसणाऱ्यांना आता सोनू सूद मदत करणार आहे. त्याने स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
ट्विटरवर त्याने एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘सज्ज व्हा.’ ‘आता झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये स्वतःच बॉस व्हा. तुमच्या गावात स्वतःचा व्यवसाय करा. या नवीन उपक्रमांतर्गत आम्ही गावातील तरुणांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करू.’
तैयार रहिए। pic.twitter.com/Eeyc6onNNk
— sonu sood (@SonuSood) February 11, 2021
सोनू सूद सोशल मीडियावर ही माहिती शेअर केल्यानंतरही लोकांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या उपक्रमाचं जोरदार कौतुकही केलं जात आहे. एकीकडे सरकार तर दुसरीकडे सोनू सूद असंही लोकांनी म्हटलं आहे. अनेकांनी सोनूच्या या कामाचं कौतूक करत खूप मोठ्या मनाचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर, गेल्या काही दिवसांआधीच हैदराबादमधील एका व्यक्तीने सोनू सूदच्या नावाने विनामूल्य ॲम्बुलन्स सेवा सुरू केली आहे. याचे उद्घाटन करण्यासाठी स्वत : सोनू सूद उपस्थित होता. हैदराबादमध्ये सोनू सूदच्या नावाने ही मोफत सेवा सुरू करण्यात आली असून रुग्णांसाठी ही खास सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेची माहिती स्वत: सोनूने सोशल मीडियावर शेअर केली आहे उद्घाटनाचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले आहे की, ही आमची पहिली पायरी…अजून खूप दूर जायचे आहे
अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊन काळात गरजूंना मदत केली होती. सोनू सूदच्या या कामाचं कौतुक करण्यासाठी रोहित पवारांनी जून महिन्यात सूदच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ‘घर जाना हैं’ हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोहोचवणाऱ्या सोनू सूद यांची त्यांच्या घरी भेट घेतली” अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिली होती. “तुम्हाला भेटून आनंद झाला भाऊ. चांगले काम चालू ठेवा. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. प्रत्येक स्थलांतरितासाठी उपलब्ध राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेवटची स्थलांतरित व्यक्ती घरी पोहचेपर्यंत मी परिश्रम घेत राहीन” अशा शब्दात सोनूने रोहितचे आभार व्यक्त केले. (soon sood will help people to start business with zero investment here know all details)
संबंधित बातम्या –
Video | सोनू सूदने गावकऱ्यांची इच्छा केली पूर्ण म्हणाला, आता बोला!
वाशिमच्या तरुणाची 2000 किमी सायकल यात्रा, आश्चर्यचकित सोनू सूद म्हणतो…
फक्त 5 लाखांमध्ये सुरू करा ‘हा’ बिझनेस, दर महिना कमवाल 70,000 रुपये
Business Idea : फक्त 50 हजारात सुरू करा व्यवसाय, महिन्याला भरभरून कमवाल
नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज कमवाल 4000 रुपये
(soon sood will help people to start business with zero investment here know all details)