मुंबई : अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करता करता, ड्रग्जच्या अँगलमुळं रियाचा भाऊ अलगद एनसीबीच्या जाळ्यात अडकला. एनसीबीकडून रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला काल अटक झाली. या दोघांना कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर उद्या एनसीबीने रियाला चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. त्यामुळं रियावरही अटकेत टांगती तलवार कायम असल्याचं बोललं जात आहे. (SSR Death Case Showik Chakraborty And Samuel Miranda In NCB custody)
सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर राहिलेला सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. या दोघांनाही किल्ला कोर्टानं 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. तर ड्रग्ज पेडलर कैजानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असेल. विशेष म्हणजे रियालाही NCB नं समन्स बजावलं असून, रविवारी तिचीही चौकशी होण्याची शक्यता आहे
त्यावेळी रियाची, शौविक, सॅम्युअल मिरांडाला समोरासमार बसवून चौकशी होण्याची शक्यता आहे. ड्रग्स कोणी कोणासाठी खरेदी केलं आणि त्यासाठी पैसे कोण देत होते? याचा शोध घेतला जाईल.
एनसीबीच्या चौकशीची कॉपी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. रियाचा भाऊ शौविकचा जबाब एनसीबीने घेतला आहे. या एनसीबीच्या कॉपीनुसार, रिया चक्रवर्ती आणि दीपेश सावंत यांचाही ड्रग्जमध्ये सहभाग असल्याचं स्पष्ट होते आहे. विशेष म्हणजे दीपेशला सुशांतच्या फ्लॅटवर रियानेच कामावर ठेवलं होतं.
सुशांतची आत्महत्या की हत्या याचा तपास सुरु असतानाच, ड्रग्जचा अँगल समोर आला. त्यामुळे तपासाची चक्रच फिरली.
? कसे आहे ड्रग कनेक्शन ?
➡️28 ऑगस्टला अब्बास रमजान लखानीला अटक
➡️21 वर्षीय लखानीकडून 46 ग्रॅम गांजा जप्त
➡️लखानीच्या माहितीवरुन कर्ण अरोराला अटक
➡️कर्ण अरोराकडून 13 ग्रॅम गांजा जप्त
➡️लखानी आणि अरोराच्या माहितीवरुन झैद विलात्रास अटक
➡️झैदकडून 9 लाख 55 हजार 750 रुपये रोख रक्कम जप्त
➡️झैदकडून 2081 डॉलर्स, 180 पौंड, 15 दिनार चलन जप्त
➡️सर्व रक्कम ड्रग्ज विक्रीची असल्याची झैदची कबुली
➡️अब्देल बासित परिहारला झैदच्या माहितीवरुन अटक
➡️झैद आणि कैझान इब्राहिमकडून परिहार गांजा घ्यायचा
➡️परिहार शौविक चक्रवर्तीसाठी गांजा खरेदी करायचा
➡️परिहार शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला ड्रग्जही द्यायचा
➡️परिहारच्या स्टेटमेंटवरुनच शौविकला समन्स पाठवून अटक
शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाची कोठडी एनसीबीसाठी महत्वपूर्ण आहे. कारण सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याची कबुली सॅम्युअलने एनसीबीला दिली आहे. तसेच रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधूनही रिया ड्रग्ज मागवत असल्याच समोर आलं आहे. त्यामुळं एनसीबी समोर हजर झाल्यानंतर, रियाच्या अटकेची दाट शक्यता आहे. (SSR Death Case Showik Chakraborty And Samuel Miranda In NCB custody)
संबंधित बातम्या :
शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी, रियासह तिघांची एकत्रित चौकशी
सुशांत सिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला अटक