मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ मिळाल्यानंतर एसटी कर्मचारी संप मागे घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सूचक विधान गोपीचंद पडळकरांनी केलंय. तर सदाभाऊ खोत यानीही हीच भूमिका घेतलीय. त्यामुळे संपाबाबत काय होणार याचा निर्णय अजूनही झाला नाही.
कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या
कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या उद्या सकाळी कामावर हजर व्हा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून करण्यात आलंय. तर संपावेळी केलेल्या कारवाईही मागे घेणार असल्याची घोषणा परब यांनी केलीय. निलंबन मागे घेणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. एसटी कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचं स्वागत होणार की संपावर ठाम राहणार हे अजूनही अस्पष्ट आहे.
कर्मचाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांशी बोलून संपाबाबत भूमिका घेऊ असं सूचक विधान केलंय. तर सदाभाऊ खोत यांनीही हीच भूमिका मांडली आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानातही दाखल झाले आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.