Sujay Vikhe Patil On Vinayak Mete : विनायक मेटेंच्या निधनानं समाजाची मोठी हानी, सुजय विखे पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Sujay Vikhe Patil On Vinayak Mete : विनायक मेटेंच्या निधनानं समाजाची मोठी हानी, सुजय विखे पाटलांनी व्यक्त केल्या भावना

| Updated on: Aug 14, 2022 | 3:20 PM

एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंना बैठकीसाठी बोलावल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. मात्र, येतानाच त्यांचा अपघात झाल्याची बातमी पहाटेच समोर आली. मेटेंच्या निधनावर दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.  

मुंबई : ‘विनायक मेटेंच्या निधनानं समाजाची मोठी हानी. विखे कुटुंब त्यांच्या दु:खात सहभागी आहे, असी भावना खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केली आहे  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं आज अपघातील निधन झालं. यावर दिग्गजांच्या प्रतिक्रिया येत आहेत. निधनाची बातमी सकाळी आली. विनायक मेटे हे माझे चांगले मित्र होते. हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे, अशी भावना आमदार रवी राणांनी व्यक्त केली आहे. मुंबईच्या (Mumbai) दिशेने येताना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला. ही अपघाताची घटना खोपलीमधल्या बातम बोगद्याजवळ घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विनायक मेटे यांना  बैठकीसाठी बोलावल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र, येतानाच त्यांचा अपघात झाल्याची बातमी पहाटेच समोर आली. मेटेंच्या निधनावर दिग्गजांना शोक व्यक्त केला आहे.

Published on: Aug 14, 2022 03:19 PM