मुंबई : सध्या सर्वत्र उन्हाचा (Summer) तडाखा वाढलाय. अश्यात कोणत्या प्रकारची पेय प्यावीत याबाबत संभ्रम आहे. पण उन्हाळ्यात घरगुती पेयांनाच प्राधान्य द्यावं, असं तज्ज्ञ सांगतात. आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या घरगुती पेयांमुळे उन्हाळ्यात तुम्हाला थंडावाही मिळेल आणि तुमचं आरोग्यही (Health tips) चांगलं राहिल. नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही हे पेय घरी सहज बनवू शकता. बडीशेप सरबत (Saunf Sarbat) तुम्ही घरीही बनवू शकता. हे सरबत बनवायला सोपं आहे. शिवाय हे तुमच्या शरीराला थंड ठेवण्याचंही काम करतं. बडीशेपपासून बनवलेलं पेय वजन कमी करण्यास देखील मदत करतं. तसंच याचा सुदृढ आरोग्यासाठी फायदा होतो. चला तर मग हा सरबत कसा बनवायचा ते जाणून घेऊया, तसंच या सरबताचे फायदेही पाहुयात…
बडीशेप सरबतसाठीचं साहित्य
1/4 कप बडीशेप, 1/4 कप साखर, 3 वेलची, 1 चमचा मीठ, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून तुळशीच्या बिया आणि थंड पाणी.
बडीशेप सरबतची कृती
तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात बडीशेप टाका. त्यानंतर हिरवी वेलची आणि साखर टाका. ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका मोठ्या भांड्यात 3 चमचे बडीशेप पावडर, मीठ, लिंबाचा रस आणि पाणी घ्या. ते एकत्र मिक्स करा. मिश्रण गाळून घ्या. ग्लासमध्ये भिजवलेल्या तुळशीच्या बिया टाका आणि मिक्स करा. तुमचा बडीशेप सरबत तयार आहे…
बडीशेप सरबत पिण्याचे फायदे
बडीशेपमध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम, फायबर आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. बडीशेप शरीरावर थंड प्रभाव टाकते. तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या आहारात बडीशेप समाविष्ट करू शकता. एक ग्लास बडीशेप सरबत प्यायल्याने तुमचे शरीर थंड होईल आणि शरीरातील उष्णताही कमी होईल.
बडीशेपच्या बियांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बडीशेप पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. उन्हाळ्यात अनेकांना पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. एका ग्लास बडीशेप सरबत प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर करण्याचे काम करते. बडीशेपमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते संक्रमण आणि व्हायरस दूर ठेवतात. बडीशेपमध्ये पोटॅशियम असते. शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास हे उपयुक्त आहे.
संबंधित बातम्या