मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं (Sushant Singh Rajput Family). सुशांतचे मित्र, बॉलिवूडमधील सहकारी, चाहते अजूनही या धक्क्यातून सावरु शकलेले नाहीत. दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांनी लाखो चाहत्यांचं प्रेम पाहून एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत या निर्णयाची घोषणा केली आहे (Sushant Singh Rajput Family).
“सुशांतच्या आठवणी आणि सन्मानासाठी आम्ही ‘सुशांतसिंह राजपूत फाउंडेशन’ची निर्मिती करत आहोत. या फाउंडेशनद्वारे सुशांतच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच विज्ञान, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना पाठबळ दिलं जाईल. तसेच पाटण्यातील राजीव नगर येथील त्याच्या घराचं रुपांतर स्मारकात करत आहोत. तिथे आम्ही त्याच्या वैयक्तिक वस्तू ठेवू. यामध्ये त्याचे पुस्तकं, टेलिस्कोप, फ्लाईट सिम्युलेटरसह अनेक गोष्टी ठेवू, जेणेकरुन त्याचे चाहते त्याच्यासोबत सदैव जोडले राहतील”, अशी घोषणा कुटुंबियांनी केली आहे.
सुशांतचे कुटुंबीय नेमकं काय म्हणाले?
तो जगासाठी सुशांतसिंह राजपूत होता. मात्र, आमच्यासाठी तो गुलशन होता. आम्ही त्याला प्रेमाने गुलशन म्हणायचो. तो स्वतंत्र विचारसरणीचा, समजुतदार आणि खूप प्रेमळ मुलगा होता. त्याला शिकण्याची खूप गोडी होती. त्यामुळे त्याला प्रत्येक क्षेत्राविषयी माहिती जाणून घ्यायला आवडायचं. त्याने खूप मोठी स्वप्न बघितली. प्रचंड मेहनत घेत ती स्वप्न साकारण्यासाठी मार्गक्रमण केलं.
गुलशनचं हसणंदेखील खूप सुंदर होतं. तो खळखळून हसायचा. तो आमच्या कुटुंबाचा गौरव आणि प्रेरणा होता.
टेलिस्कोप ही त्याची सर्वात आवडती वस्तू होती. त्या टेलिस्कोपने तो अवकाशातील चंद्र, तारे पाहायचा. आम्हाला तर अजूनही विश्वास बसत नाही की, आम्ही त्यांचं हसणं पुन्हा बघू शकणार नाहीत. त्याचे चकाकणारे डोळे, त्याच्या विज्ञानाबाबत कधीही न संपणाऱ्या गोष्टी आता आम्ही ऐकू शकणार नाहीत. त्याच्या जाण्याने कुटुंबात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरुन निघणार नाही.
तो आपल्या प्रत्येक चाहत्यावर प्रचंड प्रेम करायचा. गुलशनला इतकं भरभरुन प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद!
गुलशनच्या आठवणी आणि सन्मानासाठी आम्ही सुशांतसिंह राजपूत फाउंडेशनची निर्मिती करत आहोत. या फाउंडेशनद्वारे सुशांतच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच विज्ञान, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना पाठबळ दिलं जाईल. तसेच पाटण्यातील राजीव नगर येथील त्याच्या घराचं रुपांतर स्मारकात करत आहोत. तिथे आम्ही त्याच्या वैयक्तिक वस्तू ठेवू. यामध्ये त्याचे पुस्तकं, टेलिस्कोप, फ्लाईट सिम्युलेटरसह अनेक गोष्टी ठेवू, जेणेकरुन त्याचे चाहते त्याच्यासोबत सदैव जोडले राहतील.
सुशांतचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स आता त्याचं कटुंब हाताळेल. या माध्यमातून सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला जाईल.
संबंधित बातम्या
Sushant Singh Rajput Suicide | सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार
सुशांतच्या घरी विशेष गॉगल होता, प्रोफाईल मॅनेजरची माहिती, श्रुती मोदीचा पोलिसांत जबाब
मालकाच्या अकाली निधनाचा मूक जनावरालाही धक्का, सुशांतच्या लाडक्या कुत्र्याने जेवणही सोडलं
Sushant Singh Rajput Suicide Case | 13 जणांचे जबाब, ‘यशराज फिल्म्स’ला मुंबई पोलिसांचे पत्र