मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडमधील बड्या प्रस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाण्याची शक्यता आहे. निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Sushant Singh Rajput suicide case filed against Karan Johar Sanjay Leela Bhansali Salman Khan and Ekta Kapoor)
सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकले गेले होते आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारी करण जोहर, संजय लीला भन्साळी, सलमान खान आणि एकता कपूर यांच्याकडे होती.
सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह यांच्यासह सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली होती.
हेही वाचा : अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांच्या भेटीला, पोलिसांकडून जुजबी चौकशी
दरम्यान, सुशांतच्या दोन्ही माजी मॅनेजरचे जबाब पोलिसांकडून घेण्यात आले आहेत. दोन्ही मॅनेजर ऑक्टोबर 19 ते जानेवारी 20 या कालावधीत सोबत नव्हते. सुशांतने त्यांना जायला सांगितलं होतं. सुशांतकडे फारसे काम नसल्यामुळे त्याने जायला सांगितलं होतं. पुन्हा फेब्रुवारी-मार्चमध्ये भेटू असं तो म्हणाला होता. कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांचा जबाबही पोलीस घेत आहेत.
या सर्व परिस्थितीत सुशांतने स्वतःच एक वेगळा प्रोजेक्ट सुरु केला होता. त्याचं नाव सुरुवातीला वेगळं होत, नंतर ते बदलून ‘स्वप्न 150’ असं ठेवण्यात आलं. याबाबतची कागदपत्रे पोलिसांना सुशांतच्या घरी सापडली आहेत.
A case has been filed against Karan Johar, Sanjay Leela Bhansali, Salman Khan and Ekta Kapoor in connection with #SushantSinghRajput’s suicide case. The complaint alleges that Sushant was removed from 7 films and this compelled him to commit suicide.
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) June 17, 2020
सुशांतसिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. यावेळी पोलिसांनी तिच्याकडेही जुजबी चौकशी केल्याची माहिती आहे.
सुशांतने रविवार 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.
सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा चार यंत्रणांकडून तपास, गूढ शोधण्याचं आव्हान
बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा
सुशांतसोबत माजी मॅनेजरच्या आत्महत्येचाही नव्याने तपास, मैत्रीण रियाचाही जबाब घेणार