‘तारक मेहता…’ फेम अय्यरच्या होणाऱ्या पत्नी समोर बबिताचं सौंदर्य फिकं

| Updated on: Dec 28, 2022 | 5:16 PM

कोण आहे 'तारक मेहता...' मालिकेतील अय्यरची होणारी पत्नी; कधी करणार अभिनेता लग्न?

तारक मेहता... फेम अय्यरच्या होणाऱ्या पत्नी समोर बबिताचं सौंदर्य फिकं
'तारक मेहता...' फेम अय्यरच्या होणाऱ्या पत्नी समोर बबिताचं सौंदर्य फिकं
Follow us on

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका आवडते. मालिकेतील टप्पू सेनेची मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमध्ये राहत असलेल्या रहिवाश्यांमधील एकता चाहत्यांना प्रचंड आवडते. गेल्या १३ वर्षांपासून मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य चाहत्यांमध्ये कायम चर्चेचा विषय असतो. दरम्यान चर्चा रंगत आहे मालिकेत मिस्टर ‘अय्यर’ या भूमिकेला न्याय देणाऱ्या तनूज महाशब्दे(Tanuj Mahashabde) च्या खासगी आयुष्याबद्दल.

तनूज महाशब्दे लवकरच विवाहबंधानात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी तनूजने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तनूजच्या आयुष्यात एक महिला होती, त्याच महिलेसोबत अभिनेता लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे.

मालिकेत ‘कृष्णन सुब्रमण्यम अय्यर’ ही भूमिका साकारणारा अभिनेता तनूज नव्या वर्षाच्या सुरुवातीला लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. मिलेल्या माहितीनुसार तनूजच्या खऱ्या आयुष्यातील होणारी पत्नी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) पेक्षा अधिक सुंदर आहे.

मालिकेत मुनमुन दत्ता तनूजच्या पत्नीची म्हणजे बबिबा ही भूमिका साकारत आहे. सांगायचं झालं तर, तनूज आणि मुनमुन दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. पण दोघांनी देखील रंगणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम दिला. एका मुलाखतीमध्ये दोघांना त्यांच्या नात्याबद्दल विचारलं.

जेव्हा मुनमुन दत्ताला तनूजसोबत असलेल्या नात्याबद्दल विचारलं असता, अभिनेत्रीने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. अभिनेत्री म्हणाली, ‘मी प्रचंड प्रोफशनल आहे. शुटिंगनंतर फार क्वचितच आमची भेट झाली असेल…’ तर तनूज म्हणाला, ‘इतरांप्रमाणे मला देखील विश्वास बसत नाही, की एवढ्या सुंदर अभिनेत्रीच्या पार्टनरची भूमिका मी साकारत आहे…’ तनूज आणि मुनमुन खऱ्या आयुष्यात एकत्र नसले तरी, दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते.