Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) चौथ्या दिवशी भारताचं एका महत्त्वाच्या खेळातील आव्हान संपुष्टात आलं. भारताची आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (Manika Batra) हीला तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. या पराभवापेक्षाही जास्त चर्चा मनिका आणि भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यातील वादाची (Manika Batra Coach Controversy) आहे. रविवारी चालू सामन्यात मनिकाने रॉय यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज तिसऱ्या फेरीच्या सामन्यात पराभवानंतर मनिकाला अश्रू अनावर झाले होते. ज्यानंतर सर्व प्रकरणाचा खुलासा झाला.
जागतिक क्रमवारीत 62 व्या क्रमांकावर असलेल्या मनिकाला जगातील 10 व्या क्रमांकाची खेळाडू सोफिया पोल्कानोवा हिने सरळ चार सेट्समध्ये पराभूत केले. या पराभवानंतरच्या पत्रकार परिषदेवेळी मनिकाला बोलतानाही अवघड होत होते. तिला गहिवरुन आल्याने तोंडातून शब्द फुटत नव्हते. इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार सोफियाकडून पराभवानंतर मनिका अक्षरश: रडली. सामन्यानंतर ती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. ती पत्रकारांशीही काहीच बोलू शकली नाही. या पराभवानंतर मनिकाची टोक्यो ओलिम्पिकमधील यात्रा संपली आहे.
मनिकाचे खासगी कोच सन्मय परांजपे यांना बऱ्याच खटपटीनंतर टोक्योमध्ये जाण्याची मंजुरी देण्यात आली. मात्र त्यांना राष्ट्रीय टीमसोबत थांबू दिले नव्हते. ते वेगळ्या हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांना केवळ सरावाच्या दरम्यान ऑलिम्पिक नगरीमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली होती. परांजपे यांना मॅचच्या दरम्यानही उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मानिकान केली होती. पण आयोजकांनी फेटाळल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे दुसऱ्या राउंडमध्ये तणावाखाली मनिकाचा राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर आजच्या तिसऱ्या फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यातही सोबत सपोर्ट स्टाफ खासकरुन खाजगी कोच परांजपे नसल्याने मनिकाचे मनोबल कमी पडले, ज्यामुळे तिला सामन्यात हवी तशी कामगिरीही करता आली नाही.
भारताची टेबल टेनिस स्पर्धेत यंदा शेवटची आशा असणारी मनिका बत्रा जगातील 10 व्या क्रमांकाची खेळाडू सोफिया पोल्कानोवासोबत चार सेट्समध्ये पराभूत झाली. मनिका 8-11, 2-11, 5-11, 7-11 अशा फरकाने सामन्यात पराभूत झाली. ही आकडेवारी पाहता हे स्पष्ट होतेकी पहिला सेट सोडता सर्व सेट्समध्ये सोफियाने सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केलं होतंं.
#TeamIndia | #Tokyo2020 | #TableTennis
Women’s Singles Round 1 ResultsIndia paddler @manikabatra_TT cruised past Tin-Tin Ho whereas @sutirthamukher4 made a superb comeback against Linda Bergstroem to move into Round 2! #Goodluck girls ?? #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/39Kkn5kWhC
— Team India (@WeAreTeamIndia) July 24, 2021
हे ही वाचा
भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश
(Table Tennis Player Manika Batra got Emotional after defeated in Tokyo Olympic)