मुंबई : हिवाळ्यात आपण निर्जीव व कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी बरेच उपाय करतो. परंतु आपण आपल्या पायाच्या त्वचेची तितकी काळजी घेत नाहीत. चेहऱ्याच्या त्वचेची काळजी आपण जास्त घेतो. मात्र, पायाच्या तत्वचेकडे नेहमीच दुर्लक्ष होते. यामुळे आपल्या पायाची त्वच्या त्वचा क्रॅक होऊ लागते. या व्यतिरिक्त, आपल्या पायांच्या त्वचेचा अजूबाजुचा भाग कडक होतो. टाचांना मोठ-मोठ्या भेगा देखील पडतात. (Take care of your skin in winter)
कडक त्वच्या झाल्यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते. तुम्ही जर टाचेवरील होणाऱ्या भेगांमुळे त्रस्त असाल तर बघा आपण घरगुती उपाय करून टाचेवर होणाऱ्या भेगांपासून मुक्तता मिळू शकतो.
प्यूमाईस
आपल्या किचनमध्ये प्युमीस सहजपणे मिळतो. प्युमीस तुमची कोरडी, मृत त्वचा काढून टाकण्याचे काम करतो.
साहित्य
मोठी बादली, पाणी, प्युमीस, नारळ तेल
पद्धत
अगोदर कोमट पाण्यात पाय ठेवा आणि 10 ते 15 मिनिटे ठेवा. याशिवाय तुम्ही पाण्यात तेलाचे थेंबही घालू शकता. यानंतर, प्यूमाईस घ्या आणि आपल्या पायाच्या त्वचेवर चोळा. आपल्या पायांची डेडस्किन हळू हळू घालवा. यानंतर पाय टॉवेल्सने कोरडे करा आणि नारळाचे तेल लावा.
बेकिंग सोडा पेस्ट
बेकिंग सोडा आपण किचनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो. वापरण्याशिवाय बेकिंग सोडा त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. बेकिंग सोडा थेट चेहऱ्यावर कधीही वापरु नका. मात्र, बेकिंग सोडा वापरुन आपण पाय बरे करू शकतो.
साहित्य
2 चमचे बेकिंग सोडा
अल्युमिनियम फॉइल पेपर
पाणी
पद्धत
एका भांड्यात बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. या पेस्टमध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. यानंतर, पाय साबणाने धुवा. यानंतर हे मिश्रण आपल्या पायावर लावा आणि त्यास अॅल्युमिनियम फॉइलने झाकून टाका. आपण ही पेस्ट सुमारे एक तास ठेवा आणि नंतर पाय पाण्याने धुवा.
संबंधित बातम्या :
Food | थंडीतही शरीरासाठी लाभदायक, व्हिटामिन्सयुक्त मटार खाण्याचे ‘हिवाळी’ फायदे
(Take care of your skin in winter)