मुंबई: मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पहायाला मिळत आहे. दिवसाला सरासरी आठ हजारांच्या जवळपास नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. पुन्हा एकदा मुंबईतील कोवीड रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोबाधितांची संख्या 15 टक्क्यांनी वाढली आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, एक जानेवारीपासून जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा यावेळी कोरोनाबाधितांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र मागील दोन लाटेचा अनुभव पहाता महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व उपयायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरानाबाधितांची संख्या देखील वाढत आहे. महापालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारून 31 डिसेंबर रोजी 497, 1 जानेवारीला 389, 2 जानेवारीला 503 तर 3 जानेवारीला 574 कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या स्थितीमध्ये कोबी रुग्णालयांमध्ये एकूण 32, 781 बेड हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांरसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. याबेडमध्ये 2736 आयसीयू तर 1367 व्हेटिलेटर बेडचा समावेश आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
समीर वानखेडेंची बदली, NCB च्या विभागीय संचालकपदी कोणाची वर्णी?
राज ठाकरे यांच्याकडून आगामी 10 दिवसांमधील कार्यक्रम रद्द, सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना