चेन्नई : देशभरात दिवाळी सण उत्साहात साजरा होत आहे. मिठाई, फराळासोबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फटाके फोडण्याचा आनंद घेत आहेत. तामिळनाडूमध्ये मात्र दिवाळीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. तामिळनाडूतील अरियानकुप्पम येथे फटाक्यांमुळे झालेल्या स्फोटात बाप-बेट्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या दिवशी दुपारी 37 वर्षीय के ए कलानिसान हे आपल्या 7 वर्षाच्या मुलासोबत पुद्दुचेरीच्या सीमेला लागून असलेल्या विल्लुपुरम जिल्ह्यातील कुनेमिडू येथे जात होते. जेव्हा ते त्यांच्या स्कूटरवरून चिन्ना कोट्टाकुप्पम गाव क्रॉस होते तेव्हा एका बॅगचा अचानक स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मोठा स्फोट झाला. यात पिता-पुत्र दोघेही जागीच ठार झाले. स्फोट इतका जोरदार होता की पिता-पुत्राच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. त्यांची ओळखही होऊ शकली नाही. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अरियनकुप्पमचा परिसर स्वस्त फटाक्यांसाठी प्रसिद्ध आहे. ते येथून फटाके घेऊन घरी जात होते.
स्फोट झाला तेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होती. त्यामुळे स्फोटाच्या ठिकाणी उपस्थित असलेले तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) मध्ये दाखल करण्यात आले आहे. विल्लुपुरमचे डीआयजी एम. पांडियन आणि विल्लुपुरमचे पोलिस अधीक्षक एन. श्रीनाथ यांनी अपघातस्थळी भेट दिली.
विल्लुपुरमचे एसएचओ मुरुगानंद यांनी सांगितले की, स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आम्ही स्टेशनवरून धावत आलो, पण शरीराचे तुकडे झाले होते. आम्ही स्थानिक लोकांकडून या अपघाताबाबत चौकशी करत आहोत आणि अधिक माहिती गोळा करत आहोत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कलानिसनने देशी बनावटीच्या फटाक्यांच्या दोन पिशव्या घेतल्या होत्या. त्याचा स्फोट होऊन स्कूटरचे तुकडे झाले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. कोट्टाकुप्पम पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक बी अरुण यांनी सांगितले की, मयत कलानिसन आणि त्याच्या सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलानिसनने बुधावरी फटाके खरेदी करून सासरच्या घरी ठेवले होते. (The unfortunate death of a father and son in an explosion caused by firecrackers)
A father-son duo was killed and three others were injured when a bag of country fireworks they were carrying in their motorcycle exploded accidentally at Kottakuppam town on Thursday afternoon. pic.twitter.com/VknP6ebDU4
— Express Chennai (@ie_chennai) November 5, 2021
इतर बातम्या
हायब्रिड वारफेअरच्या मुद्द्यावर मोदींची चिंता; चीनकडून असलेल्या धोक्याबाबत जवानांना केले सतर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबरमध्ये नेपाळ दौऱ्यावर जाणार?; चौथ्या दौऱ्यात लुम्बिनीलाही भेट देणार