किरण माने, सतिश राजवाडे, जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला, या खासदारांनी घडवली भेट

| Updated on: Jan 20, 2022 | 3:16 PM

किरण माने, सतिश राजवाडे, जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला, या खासदारांनी घडवली भेट

किरण माने, सतिश राजवाडे, जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला, या खासदारांनी घडवली भेट
Follow us on

मुंबई – स्टार प्रवाहवरील (STARPRAVAH) मुलगी झाली हो या मालिकेतील वाद एका टोकाला गेल्याचे आपण पाहिले. त्यानंतर किरण माने (KIRAN MANE) यांचं होणार काय असा अनेकांना प्रश्न पडला होता. परंतु किरण माने आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोणत्या कारणासाठी भेटले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच सतिश राजवाडे सुध्दा जितेंद्र आव्हाड (JITENDRA AWAD) यांच्या भेटीसाठी गेल्याचं समजतंय. विशेष म्हणजे सतीश राजवाडे हे स्टार प्रवाहाचे कंटेंट हेड आहेत.

किरण माने यांना मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा दर्शविला होता. कारण किरण माने यांनी राजकीय पोस्ट लिहिल्यामुळे त्यांना काढण्यात आल्याचं त्यांनी फेसबुक पोस्टवरती म्हटलं होतं. त्यामुळे मानेंची बाजू आव्हाडांनी घेतल्याची चर्चा होते. शिवसेनेचे खासदार अमोल कोल्हे यांनी आव्हाडांच्यासोबत बैठकीचं नियोजन केल्याने नेमकं काय होणार याकडे डोळे लागले आहेत.

 

प्रेमळ बायको, खडूस बॉस!, ‘रोज नवी ठिणगी वादाची-‘बॉस माझी लाडाची’, नवी कथा-नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुरस्कारांचं गाठोडं घेऊन ‘पांघरुण’ प्रेक्षकांच्या भेटीला, महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमा 4 फेब्रुवारीपासून सिनेमागृहात