नाशिक : लासलगाव येथे आज (4 फेब्रुवारी) सकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएममशीन फोडून पावणेपाच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली (thief cut ATM machine through gas cutter). वाढत्या चोरीमुळे लासलगावमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे (thief cut ATM machine through gas cutter).
निफाड तालुक्यातील विंचूर येथे नाशिक-औरंगाबाद राज्यमहामार्गावर एका कॉम्प्लेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएमजवळ सकाळी सहा वाजेच्या सुमारास चोरटे आले. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएममशीन फोडलं आणि त्यातील पावणेपाच लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि निफाड उपविभागीय पोलिस उपअधीक्षक माधव पडिले यांना याबाबत माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी तीन पथके करुन तपासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये मोटरसायकलींची चोरी, चेन स्कॅचिंग, आठवडे बाजारात मोबाईल आणि पाकीट चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यानंतर आता चोरट्यांनी एटीएम फोडून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभं केलं आहे.